
शिरवळ पोलीस ठाण्याची धडाकेबाज कारवाई
खंडाळा तालुक्यातील मौजे भादे गावच्या हद्दीत वीर धरण परिसरात एका महिलेला इन्स्टाग्रामवरून चॅटिंगच्या माध्यमातून बोलावून अपहरण व मारहाणीचा प्रकार घडला.
आरोपींनी मारुती अल्टो कार (MH 12 NE 3972) मध्ये बसवून फायबर काठीने व हाताने मारहाण केली.
तसेच “तक्रार केली तर अॅट्रोसिटी व अत्याचाराचा गुन्हा दाखल करू” अशी धमकी देऊन ती कार खंडणीच्या स्वरूपात नावावर करण्याची जबरदस्ती केली.
घटनेनंतर तक्रार मिळताच
सातारा पोलीस अधीक्षक मा. श्री. तुषार दोशी
अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कुडुकर
फलटण उपविभागीय अधिकारी श्री. विशाल खांबे
यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीसांनी वेगवान तपास सुरु केला.
केवळ एका तासात आरोपींचा शोध घेऊन
1. युट्युब पत्रकार किरण प्रकाश मोरे
2. मनसे तालुका अध्यक्ष इरफान दिलावर शेख
3. जिल्ह्यातून हद्दपार विशाल महादेव जाधव
(सर्व राहणार शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा)
या तिघांना अटक करण्यात आली आहे.
तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. सतीश आंदेलवार करत असून, या प्रकरणात उल्लेखनीय कामगिरीबद्दल संपूर्ण शिरवळ पोलीस पथकाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.
कोणालाही या आरोपींबद्दल तक्रार असल्यास निर्धास्तपणे शिरवळ पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.