
ईगल फाऊंडेशनचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
अमळनेर येथील श्रीमती शैला बैसाणे यांना
'राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार 2025
झाल्या सन्मानित
ईगल फाऊंडेशनचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
अमळनेर येथील श्रीमती शैला बैसाणे यांना
'राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार 2025
झाल्या सन्मानित
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
ईगल फाऊंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त डॉ. अण्णासाहेब डांगे शिक्षण संकुल येथे भव्य गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री दादा इदाते, माजी मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे, डॉ. डी.वाय. पाटील शिक्षण समूहाचे विश्वस्त सुर्यकांत तोडकर, ऑल इंडिया धनगर समाजाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, दै. रोखठोकचे संपादक सुरेश माडकर व कार्यकारी संपादक सुरेश राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. अंदानी लिखित “ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी… एक शोध” या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ईगल फाऊंडेशनच्या समाजाभिमुख उपक्रमांचे सर्व मान्यवरांनी कौतुक केले.
या सोहळ्यात नवीन माध्यमिक विद्यालय अंतुर्ली–रंजाणे (ता. अमळनेर) येथील उपशिक्षिका श्रीमती शैला गंगाधर बैसाणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य, विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून राबविलेले विविध उपक्रम, तसेच शाळेतील सर्वांगीण प्रगतीसाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत त्यांना सन्मानपत्र, मानाचा फेटा आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी त्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि उपक्रमशीलता यापूर्वीही अनेक पुरस्कारांनी गौरविली गेली असून, ईगल फाऊंडेशनचा हा सन्मान त्यांच्या कार्यात अधिक प्रेरणा देणारा ठरला.
या कार्यक्रमाचे स्वागत फाऊंडेशनचे अध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी केले, तर आभार प्रा. महेश मोटे यांनी मानले. सूत्रसंचालन पोपट काटकर यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फाऊंडेशनचे पदाधिकारी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले.
श्रीमती बैसाणे यांच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात आले आहेत.