logo

दिल्ली बम धमाके के उपडेट

[11/11, 9:42 am] shrinivedanfilms: दिल्ली भीषण बॉम्बस्पोटाने हादरली आहे. लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये भीषण स्फोट झाला आहे. मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ झालेल्या या स्फोटात 10 लोकांचा मृत्यू झाला आहे.
[11/11, 9:42 am] shrinivedanfilms: हा स्फोट इतका भीषण होता की, स्फोटानंतर शेजारील दोन ते तीन इतर वाहनांनी पेट घेतला. या आगीत तीन ते चार वाहने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. अशातच आता या स्फोटाचा तपास सुरु असताना पोलीसांना सर्वात मोठं यश मिळाले आहे. एक संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

एका संशयिताला ताब्यात घेतले

दिल्ली पोलीसांच्या सुत्रांनी हा हल्ला नियोजित कट असून दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता वर्तवला आहे. अशातच आता स्फोटाच्या वेळी कारमध्ये असलेल्या एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्याला गंभीर अवस्थेत एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची चौकशी सुरु करण्यात येणार आहे. यातून मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

घटनास्थळावरून साहित्य जप्त

या हल्ल्यानंतर फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून स्फोटक साहित्य, वायरिंग आणि बॅटरीचे तुकडे ताब्यात घेतले आहेत. घटनास्थळी या वस्तू सापडल्यामुळे हा स्फोट हाताने घडवला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या घटनेनंतर आता हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहेत.

300 अंतरापर्यंत स्फोटाचा आवाज ऐकू गेला

लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की आसपास 200 ते 300 मीटर अंतरावर स्फोटाचा आवाज ऐकू गेला. या स्फोटात एकूण 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. काही गाड्यांचे फक्त सांगाडे उरले आहेत. त्यामुळे संपूर्ण दिल्लीत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुणे-मुंबईत हायअलर्ट जारी

दिल्लीतील या घटनेनंतर देशातील प्रमुख शहरांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे मुंबईतही हायअलर्ट जारी करण्यात आला असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. देशात इतर ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. दिल्लीतील स्फोटानंतर केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून हा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

1
782 views