logo

आघाडीसह शिवसेना-राष्ट्रवादीला खिंडार, शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश - भाऊसाहेब पाटील मुके (परतूर प्रतिनिधी)

“राष्ट्र प्रथम” ही भारतीय जनता पक्षाची मूळ भूमिका; भाजपा हा सर्वसामान्य जनतेचा सर्वाधिक विश्वासार्ह पक्ष - आमदार बबनराव लोणीकर

लोणीकर पिता-पुत्रासह भागवत कराड यांच्या उपस्थितीत बाजार समिती संचालक डॉ. दत्तात्रय काकडे, मनोज वायाळ अनिरुद्ध काकडे, सरपंच बबन सरवदे यांच्यासह पदाधिकारी- कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

भाऊसाहेब पाटील मुके - (परतूर- मंठा प्रतिनिधी)
मंठा तालुक्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला असून, महाविकास आघाडीला मोठे खिंडार पडले आहे. काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट, ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड व भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पक्षप्रवेश हा केवळ राजकीय बदल नसून राष्ट्रसेवेचा नवा संकल्प आहे. नव्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम करून पक्षाच्या विचारधारेचा प्रसार घराघरात करावा. संघटनशक्ती आणि कार्यकर्त्यांचा सन्मान हीच भाजपची खरी ताकद आहे. परतूर येथे संपन्न झालेल्या प्रवेश सोहळा कार्यक्रमात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. या पक्षप्रवेशामुळे भाजपाची ताकद मंठा तालुक्यात लक्षणीयरीत्या वाढली असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घटना राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरत आहे.

“राष्ट्र प्रथम” ही भारतीय जनता पक्षाची मूलभूत भूमिका असून, देशाच्या हिताला सर्वाधिक प्राधान्य देत काम करणे हेच भाजपचे ध्येय आहे. भाजप सरकारने गेल्या काही वर्षांत सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक लोककल्याणकारी योजना राबवून देशाच्या विकासात मोलाचा वाटा उचलला आहे. त्यामुळे आज भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्य जनतेच्या मनातील सर्वाधिक विश्वासार्ह पक्ष ठरला आहे, असे प्रतिपादन भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केले.

आमदार लोणीकर म्हणाले, “भारतीय जनता पक्ष हा केवळ राजकीय पक्ष नाही, तर राष्ट्रसेवेची एक चळवळ आहे. देशातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. ‘राष्ट्र प्रथम, पक्ष नंतर आणि व्यक्ती शेवटी’ हा आमचा कार्यसंस्कार आहे. भाजप सरकारने सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी अनेक प्रभावी योजना राबवल्या आहेत. ग्रामविकास, शेती, महिला सक्षमीकरण आणि तरुणांना रोजगार या क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे.

भाजपात नव्याने प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पूर्णपणे निश्चिंत राहावे. पक्षात प्रत्येकाला योग्य तो मान-सन्मान आणि स्थान दिले जाईल. भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी झटणारा पक्ष आहे. संघटनशक्ती आणि कार्यकर्त्यांचा सन्मान हीच भाजपची खरी ताकद आहे. पक्षात आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपलेपणाची भावना वाटली पाहिजे — हेच आमचे उद्दिष्ट आहे. कार्यकर्त्यांच्या परिश्रमांमुळेच आज पक्ष जनतेच्या विश्वासास पात्र ठरला आहे. नव्या कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा प्रसार करावा.सर्वांनी l संघटन बळकट करत आणि पक्षाच्या धोरणांचा जनतेपर्यंत प्रसार करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे असेही आमदार बबनराव लोणीकर यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना आमदार लोणीकर म्हणाले कि, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश जलदगतीने प्रगतीच्या मार्गावर आहे. गरीब, शेतकरी, महिला आणि युवकांसाठी केंद्र व राज्य सरकारने प्रभावी योजना राबवल्या आहेत. त्यामुळे जनतेचा विश्वास भाजपवर अधिकाधिक दृढ होत आहे. कार्यक्रमात विविध विकासकामांची माहिती देताना त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना संघटन बळकट करण्याचे आवाहन देखील आमदार लोणीकर यांनी यावेळी केले.

पुढे बोलताना आमदार लोणीकर म्हणाले कि, नव्याने प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना भाजपचे राष्ट्रीय ध्येय, कार्यसंस्कृती आणि विकासाभिमुख धोरणे यांची माहिती दिली. यावेळी आमदार लोणीकर म्हणाले की, भाजप हा सर्वसामान्य जनतेच्या मनात विश्वास निर्माण करणारा पक्ष आहे. देशाच्या विकासात प्रत्येक कार्यकर्त्याची भूमिका महत्त्वाची आहे. नव्या कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे पक्ष अधिक बळकट होईल. या वेळी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना पक्षाचा रुमाल देऊन त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व कार्यकर्त्यांना पक्षाच्या आगामी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले.

====================
परतूर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमादरम्यान काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश देण्यात आला. यामध्ये मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा जयपुर चे सरपंच डॉ. दत्तात्रय काकडे युवा सेना जयपूर सर्कल प्रमुख अनिरुद्ध काकडे शिवसेना उपतालुकाप्रमुख मनोज वायाळ आंभोळा कदम येथील सरपंच बबन सरवदे , ग्रामपंचायत सदस्य चंद्रभान काकडे संदीप काकडे रामेश्वर काकडे शिवाजीराव वायाळ, रमेश वायाळ सुभाष ताठे, विठ्ठल राठोड शिवसेना शाखाप्रमुख दत्ताराव महाजन शिवसेना बूथ अध्यक्ष लक्ष्मण बोराडे यांच्यासह अशोक काकडे लक्ष्मण काकडे जगन राठोड सर्जेराव सपकाळ आत्तम दाभाडे रामभाऊ काकडे प्रल्हाद काकडे सर्जेराव काकडे एकनाथ काकडे ज्ञानेश्वर काकडे भगीरथ काकडे मारुती दाभाडे बाबासाहेब काकडे किसनराव तौर सुधाकर आठवले दत्ताराव वायाळ भागवत टकले गौतम सदर नामदेव सदर महादेव दिवटे धोंडीबा वायाळ संतोष वायाळ विकास आठवले शालिकराम वायाळ दत्ता आठवले सिद्धेश्वर दिवटे संदीप दिवटे भागवत दिवटे भास्कर सरवदे बबन भांदर्गे पप्पू सरवदे आनंद बोराडे विशाल बोराडे भारत बोराडे सुनील सामाले विष्णू बोराडे रोहिदास राठोड सुभाष राठोड अर्जुन राठोड भारत राठोड राजेश जाधव संतोष पवार गजानन चव्हाण राजेश चव्हाण अनिल राठोड अजय राठोड यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वात व भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
=====================

यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव राहुल भैया लोणीकर, संदीप भैया गोरे गणेशराव खवणे सतीशराव निर्वळ कैलासराव बोराडे गजानन देशमुख राजेश मोरे माऊली तनपुरे तालुकाध्यक्ष नितीन राठोड संपत टकले विलास घोडके मनोज देशमुख माऊली गोंडगे कैलास चव्हाण आनंद जाधव निवास देशमुख मुस्तफा पठाण जगनराव टकले विवेक काकडे तानाजी शेंडगे राहुल बाहेकर अनिल चव्हाण आबासाहेब सरकटे सुधीर कुलकर्णी विजय वायाळ बाजीराव वायाळ आदिनाथ काकडे संभाजी काकडे नंदू टकले यांच्यासह लोकप्रतिनिधी पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1
1061 views