
इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर
इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर
साकळी
दिनांक १०/११/२०२५
प्रतिनिधी
(आरिफ खान)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (महाराष्ट्र बोर्ड ) फेब्रुवारी /मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर केले आहे .
बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक पुढीलप्रमाणे
प्रायोगीक,तोंडी ,
श्रेणी ,अंतर्गत मूल्यांकन परीक्षा शुक्रवार २३ जानेवारी २०२६ पासून ते ९ फेब्रुवारी २०२६ पर्यंत असेल तसेच लेखी परीक्षा मंगळवार १० फेब्रुवारी २०२६ पासून ते १८ मार्च २०२६ पर्यंत असेल.
दहावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक पुढीलप्रमाणे
प्रायोगीक ,तोंडी ,
श्रेणी ,अंतर्गत मूल्यांकन परीक्षा शुक्रवार २ फेब्रुवारी २०२६ पासून ते १८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत असेल तसेच लेखी परीक्षा शुक्रवार २० फेब्रुवारी २०२६ पासून ते १८ मार्च २०२६ पर्यंत असेल.
वेळापत्रक आणि नोंदणी संबंधी सविस्तर सूचना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ www.mahahsscboatd.in वर उपलब्ध आहे .
या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर बोर्डाने सर्व केंद्रांची कसून तपासणी करण्याच्या निर्णय घेतला आहे .३० ऑक्टोबर २०२५ रोजी पुणे विभागीय बोर्डाच्या अधिकाऱ्यांसह शिक्षणाधिकारी,व केंद्रप्रमुखांची महत्वपूर्ण बैठक झाली या बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षा आणि परीक्षातील पारदर्शकते संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे.परीक्षेत कॉपीच्या धोका टाळण्यासाठी
सरमिसळ पद्धती कायम ठेवण्यात येणार आहे प्रत्येक वर्ग खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे.तसेच स्वच्छतागृह, पाण्याची पुरेशी सोय व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. एकूणच बोर्डाने तंत्रज्ञान व सुरक्षेच्या माध्यमातून शैक्षणिक क्रांती घडवण्याच्या प्रयत्न केल्याचे दिसतंय.
=============