logo

निपाणी वडगाव येथील ग्रामसभेत खडाजंगी पत्रकास धमकावले गुन्हा दाखल

तालुक्यातील निपाणी वडगाव येथील विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती..
यामध्ये विविध विषयावरती चर्चा करणे तसेच निपाणी वडगाव तंटामुक्ती अध्यक्ष ची निवड करणे आदी विषयां संदर्भात ग्रामसभा आयोजित केली होती.
यावेळी ग्रामसभा सुरू होण्यापूर्वी नागरिकांमधून प्रश्न उपस्थित करण्यात आला की ग्रामसभेची सूचना आम्हाला मिळाली नाही.
यामुळे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविकास अधिकारी व सदरील नागरिक यांच्यात शाब्दिक चकमक झाली. सदरील गोष्टीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग जनमत न्यूजचे श्रीरामपूर तालुक्याचे प्रतिनिधी हे करत होते. त्याचवेळी अचानक निपाणी वडगाव ग्रामपंचायत सदस्य रवींद्र पवार आणि तंटामुक्ती अध्यक्ष होऊ पाहणारा पाटीलबा राऊत व त्यांचे दोन साथीदार भागचंद नवगिरे यांच्या अंगावर धावून आले व मोबाईल घेण्याचा प्रयत्न करू लागले तसेच सदरील व्हिडिओ डिलीट न केल्यास जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न असा पडला आहे कीं जर अशा प्रवृत्तीचे लोक तंटामुक्ती अध्यक्ष झालें तर काय न्याय निवाडा करणार आहे. जे स्वतः अशाप्रकारे गुंड प्रवृत्तीने वागत असतील ते सदरील पदाची काय किंमत ठेवणार आहे. तसेच सदरील ग्रामसभेमध्ये अशोक कारखान्याच्या कामगारांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. विशेष बाब म्हणजे अशोक कारखान्याचे कर्मचारी कधीही ग्रामसभेसाठी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहत नाही. बहुतेक कारखाना प्रशासनाने गेल्या सात ते आठ महिन्याचे पगार थकवले असल्याने त्याबाबत कारखाना प्रशासनाला संबंधित पगार दिल्याशिवाय कारखाना सुरू करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देऊ नये. अशा आशेने आलेले होते परंतु ग्रामसभा न झाल्याने त्यांचाही हिरमोड झाला. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल सोनवणे यांनी ३०२ सारखा प्रकार परत होऊ नये असा उल्लेख केला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला. परंतु ३०२ म्हणजे काय किंवा ३०२ कशाशी संबंधित आहे याबाबतचा खुलासा कुणाकडूनही करण्यात आला नाही. यामुळे गावातील नागरिकांमध्ये विविध तर्क वितर्क लावले जात आहे.
तसेच जन्मात मराठी न्युज चे पत्रकार भागचंद नवगिरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्रजी फडवणीस,पोलीस महासंचालक नाशिक आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना कळविण्यात आले आहे. तसेच पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत सदरील दोषी वरती गुन्हे दाखल जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर घटनेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जनमत मराठी न्यूजचे संपादक राजेंद्र आंब्रे यांनी नाशिक पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन या घटनेबाबत निवेदन सादर करून संबधीतावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पुर्ण केली आहे पुढील तपास श्रीरामपुर शहर पोलिस करत आहेत -

66
7751 views