logo

शिवाजीराव गायकवाड उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित.

कपिलधार/मांजरसोँभा - शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने गेल्या 30 वर्षापासून विविध क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते, या संघटनेच्या पुरस्कारात राज्यातील उत्कृष्ट पत्रकाराचाही पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो 2025 चा दिला जाणारा शिवाराष्ट्रीय भूषण उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने त्यांना कपिलधार येथे सेवा संघटनेच्या मेळाव्यात राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील, शिवा संघटनेचे राष्ट्रीय तथा सेवा जनशक्ती पक्षाचे प्रमुख प्राध्यापक मनोहर धोंडे आमदार अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्यासह संत महंतांच्या उपस्थितीत 5 नोव्हेंबर 2025 रोजी बीड जिल्ह्यातील कपिलधार येथे अहमदपूर येथील आवाज बहुजनांचा न्यूज चॅनल चे संपादक पत्रकार शिवाजीराव रामराव गायकवाड यांना शिवा राष्ट्रीय भूषण उत्कृष्ट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, शिवा संघटनेच्या वतीने गेल्या 30 वर्षापासून कार्तिकी शुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने बीड जिल्ह्यातील कपिलधार येथे सेवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्या माध्यमातून राज्यव्यापी मेळावा घेण्यात येतो, या मेळाव्यात विविध क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो यामध्ये पत्रकारांचाही समावेश असून 2025 च्या पत्रकार पुरस्कारामध्ये अहमदपूर येथील आवाज बहुजनांचा न्यूज चॅनल चे संपादक पत्रकार शिवाजीराव गायकवाड यांना शिवाराष्ट्रीय भूषण उत्कृष्ट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, यावेळी शिवानंदतात्या हेंगणे, माजी नगरसेवक अभय मिरकले यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती, कमी कालावधीत उत्कृष्ट पत्रकारिता करून महाराष्ट्र राज्यामध्ये अत्यंत मानाचा व सन्मानाचा समजल्या जाणाऱ्या पुरस्कारास पात्र ठरल्याबद्दल शिवाजीराव गायकवाड यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

0
752 views