फेसबुक व इंस्टाग्राम च्या आधारे महीलांसोबत मैत्री करून त्यांचा गैरफायदा घेणाऱ्या इसमास भिगवण पोलिस यांच्याकडून अटक.
फेसबुक व इंस्टाग्राम च्या आधारे महीलांसोबत मैत्री करून त्यांचा गैरफायदा घेवुन त्यांचे
जवळील सोन्याचे दागिणे व रोख रक्कम काढुन घेणारा अटट्ल सराईत गुन्हेगाराच्या आवळल्या
मुसक्या, त्यांचे ताब्यातुन ३,००,००० /- रू किंमतीचा मुदमाल केला हस्तगत....
यातील आरोपी मजकुर नामे संग्राम पाटील पुर्ण नाव पत्ता माहीती नाही. याने यातील पिडीत महीला यांचेशी फेसबुक व्दारे ओळख करून पिडीत फिर्यादीस ब्युटी पार्लरसाठी बॅकेतुन ६,००,०००/- रूपये लोन काढुन देतो असे म्हणुन तुला माझे बायकोची बहीण म्हणुन सही करावी लागेल असे सांगुन दि. २३/९/२०२५ रोजी सकाळी ११:०० ते १४:०० वा चे दरम्यान मौजे मदनवाडी, ता. इंदापुर, जि. पुणे गावचे हददीत एका लॉजमध्ये पिडीत फिर्यादी यांना घेवुन जावुन फिर्यादीचे जवळील ४ ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र ५ ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स, व ६,०००/- रू रोख रक्कम व मोबाईल असे पर्समध्ये ठेवण्यास सांगुन बँकेमधील लोनच्या फॉर्मवर फिर्यादीच्या अंगावरील तिळ व खुणा
दाखविण्यासाठी लॉजमध्ये नेवुन फिर्यादीची कपडे काढुन फिर्यादीची इच्छा नसताना दमदाटी करून फिर्यादीचे सोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध
केले. व फिर्यादीचे नकळत बॅगमधील सोन्याचे दागिणे व रोख रक्कम व मोबाईल असा एकुण ७३,०००/- रू किंमतीचा माल फिर्यादीचे
संमतीशिवाय चोरून नेला होता. सदर बाबत भिगवण पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नंबर. २३६ / २०२५, भारतीय न्याय संहीता. सन. २०२३चे कलम. ६४,३०३ (२), ३५१ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा प्रकार हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा होता. अशा प्रकारे आणखी महीला यामध्ये बळी पडु नयेत व आरोपी लवकरात लवकर जेरबंध व्हावा या हेतुने भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. विनोद महांगडे, सहा. पोलीस निरीक्षक यांनी तपास पथक तयार करून सदर गुन्हयातील अज्ञात संग्राम पाटील या आरोपीचा शोध घेणेकामी तपास पथक तयार केले. आरोपीचा तांत्रिक विश्लेषनाचे आधारे शोध घेत असताना आरोपी अकलुज, वेळापुर, जि.सोलापुर याभागामध्ये फिरत असल्याचे निष्पन्न झाल्याने तपास पथकामधील पोलीस अंमलदार महेश उगले, संतोष मखरे यांना शोध घेणेकामी रवाना केले. सदर आरोपीचा शोध घेत असताना गोपनिय बातमीदार यांचे मार्फतीने माहीती काढली.
असता आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन तो आपले नाव बदलून, पोलीस अधिकारी असल्याचे भासवुन अशाच प्रकारे महीलांची फसवणुक
करीत असल्याची माहीती मिळाली. त्याचे आधारे आरोपीचा शोध घेत असताना तो अकलुज पोलीस स्टेशनचे हददीत मिळुन आला. त्यास ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपुस करता त्याने त्याचे नाव गणेश शिवाजी कारंडे, वय ४३ वर्ष, रा. श्रीपुर, ता. माळशिरस, जि. सोलापुर असे असल्याचे निष्पन्न झाले. त्यांचेकडे विचारपुस करता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यामुळे त्यास सदर गुन्हयाचे तपासकामी दिनांक. २८/१०/२०२५ रोजी १८:४६ वा अटक करण्यात आली आहे. अटक आरोपी यांचेकडुन गुन्हयातील चोरीस गेलेला व गुन्हा करण्यासाठी वापरलेली साधने असा एकुण ३,००,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटक आरोपीची दिनांक ०७/११/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास विनोद महांगडे, सहा. पोलीस निरीक्षक भिगवण पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदर गुन्हयातील अटक आरोपी नामे गणेश शिवाजी कारंडे, याचेकडे सखोल तपास करता तो स्वतःचे नाव गुप्त ठेवुन त्याचे मोबाईलमध्ये " संग्राम पाटील " व " पृथ्वीराज पाटील " या नावाने फेसबुक अकाऊंट वापरून पोलीस अधिकारी यांचे प्रोफाईलला फोटो ठेवुन सदरचा फोटो हा त्याचाच आहे असे भासवुन त्याचे आधारे फक्त महीलांना फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवुन त्यांना त्यांचे जाळयात ओढुन त्यांची फसवणुक करीत असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे.
तरी अशा प्रकारचा कोणाचे सोबत अनुचित प्रकार घडला असल्यास त्यांनी तात्काळ भिगवण पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे संपर्क साधवा असे जाहीर आव्हान करण्यात येत आहे.
सदर गुन्हयातील अटक आरोपी नामे गणेश शिवाजी कारंडे, वय ४३ वर्ष, रा. श्रीपुर, ता. माळशिरस, जि. सोलापुर यांचेवर यापुर्वी खालील
प्रमाणे पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत.
पोलीस स्टेशन
अकलुज, जि. सोलापुर
अ.क गुन्हा. रजि.नंबर १ ४८७/२०१७
२ मंगळवेढा, जि. सोलापुर
३ पंढरपुर तालुका, जि. सोलापुर
४ लोणंद, जि.सातारा
कलम.
भादवि कलम ३५४(अ), १७० ८३/२०२२ ६२०/२०२० ७५/२०२३
भादवि. कलम. ३५४, ३५४(अ)
भादवि कलम ३५४(अ), १७०
भादवि कलम ३७६, ३५४, ५०६, ३९२,१७०
सदरची कामगिरी मा. संदीप सिंह गिल्ल सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा. गणेश बिरादार सो, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रामीण, मा. डॉ सुदर्शन राठोड सो, उपविभागीय पोलीस अधीकारी, बारामती विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली विनोद महांगडे, सहा.
पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार सचिन पवार, महेश उगले, संतोष मखरे, प्रमोद गलांडे, गणेश पालसांडे, वैष्णवी राऊत भिगवण पोलीस
स्टेशन यांनी केली आहे.