नगराध्यक्षांसह बहुमताने भाजपाची सत्ता नगरपालिकेत सत्ता द्या.मंत्री श्री. संजय सावकारे यांचे चाळीसगाव सभेत आवाहन... I
तुमचा निर्णय चुकला तर चाळीसगाव शहराचा विकास थांबेल...
नगराध्यक्षांसह बहुमताने भाजपाची सत्ता नगरपालिकेत सत्ता द्या
मंत्री श्री. संजय सावकारे यांचे चाळीसगाव प्रभाग क्र.४ मधील सभेत आवाहन
चाळीसगाव दि.७ - चाळीसगावच्या विकासासाठी मंगेशदादा चव्हाण अहोरात्र मेहनत घेत आहेत. चाळीसगावचा चेहरामोहरा त्यांनी बदलवून टाकला आहे. येत्या चार ते पाच वर्षात चाळीसगाव शहरासाठी एक हजार कोटींचा निधी आणण्याचा त्यांचा संकल्प आहे मात्र हा संकल्प तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा नगरपालिकेत नगराध्यक्षांसह भारतीय जनता पक्षाची बहुमताने सत्ता असेल कारण घटनेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेला स्वायत्त अधिकार आहेत. मंगेश दादांनी जरी निधीचा प्रस्ताव तयार केला मात्र त्याचा ठराव हा नगरपालिकेत बहुमताने मंजूर करावा लागतो. मी पहिल्या टर्म ला आमदार असताना भुसावळ नगरपालिकेत विरोधकांची सत्ता होती त्यामुळे अनेक ठराव होत नव्हते. मी निधी आणून देखील आडकाठी केली जात असल्याने शेवटी कोर्टात जाऊन मला रस्त्यांची कामे करावी लागते. तुमचा निर्णय चुकला तर चाळीसगावचा विकास थांबले. हा संघर्ष, हा कटू अनुभव चाळीसगावकराना नको असेल तर नगरपालिका मध्ये बहुमताने भारतीय जनता पक्षाची सत्ता द्या असे आवाहन राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री श्री संजय सावकारे यांनी केले. ते काल चाळीसगाव नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शास्त्रीनगर दुर्गामाता मंदिर आयोजित सभेत बोलत होते.
यावेळी खासदार स्मिताताई वाघ, आमदार मंगेशदादा चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, शहराध्यक्ष नितीन दादा पाटील, निवडणूक प्रभारी प्रा. सुनील निकम सर, माजी नगरसेवक पंडित अण्णा चौधरी, प्रदीप दादा देसले, आर के दादा चौधरी, मार्केट उपसभापती शैलेंद्र पाटील सर, शरद अण्णा मोराणकर, अशोक काका बागड, कपिल दादा पाटील, संगीताताई गवळी, पवार गुरुजी, एकनाथ अण्णा चौधरी, अविनाश नाना चौधरी, हिरामण दादा चौधरी, सोमनाथ आबा, आर सी आबा पाटील, डॉ.महेंद्र राठोड, सुरेश दादा कुमावत, दिलीपभाऊ कापडणे, वनेशभाऊ खैरनार, संदेश भाऊ येवले, भावेशदादा कोठावदे, हर्षलदादा चौधरी, मोहिनी ताई गायकवाड, मोनिकाताई गांगुर्डे, पूजाताई लड्डे, विजयाताई पवार, भगवान आबा राजपूत, बबन काका पवार, बापू अहिरे, छोटू दादा चौधरी, अनिल भाऊ ठाकरे, नानाभाऊ, सीसी वाणी सर, रवी आबा पाटील, प्रशांत बापू पाटील, धर्मा आबा वाघ, राजुभाऊ राठोड, विजुभाऊ जाधव, पप्पू दादा वाणी, डॉ. वसंतराव सूर्यवंशी, सुनील दादा जमादार, संभाप्पा जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी मनोगतात सांगितले की, चाळीसगाव हे माझे कुटुंब समजून म्हणून मी काम करत आहे. माझ्या घराच्या कामात जसं माझं लक्ष असतं तसेच चाळीसगावच्या प्रत्येक विकास कामांमध्ये मी वैयक्तिक लक्ष देतो आणि आज त्याची प्रचिती तुम्हाला रस्ते, पूल, उद्याने आदी कामांच्या माध्यमातून येत आहे. केवळ शास्त्रीनगर च्या परिसरामध्ये गेल्या तीन वर्षातच जवळपास 20 ते 22 कामे, उद्याने, रस्ते केले असून जवळपास 70 ते 80 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. दयानंद ते खरजई नाका रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम विशेष बाब म्हणून मंजूर केले असून येत्या पंधरा दिवसात ते 25 टक्के पर्यंत संपेल. अशा पद्धतीने विकासाचे व निधी आणायचे कुणी जाहीर आश्वासन देत असेल तर तुम्ही जरूर त्याच्यामागे पाठीमागे उभे राहा मात्र विरोधकांचा मागील अनुभव देखील आठवा. निवडणुकीत विरोधक दिशाभूल करतील, जात - धर्म भावनिक मुद्दे आणतील मात्र तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर ठाम राहा. ही निवडणूक चाळीसगावच्या भावी पिढ्यांचे भविष्य ठरविणारी आहे असे आवाहन यावेळी आमदार चव्हाण यांनी उपस्थितांना केले.