
पार्थ पवार वतन जमीन महाघोटाळा
पार्थ पवार यांचा महार वतन जमीन महा भूखंड घोटाळा
कोरेगाव पार्क पुणे येथील 1800 कोटी रुपये किमतीचा 40 एकर भूखंड अवघ्या 300 कोटी रुपयाला खरेदी केला
21 कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी
माफ करवून केवळ 500 रुपयाच्या स्टॅम्प वर व्यवहार उरकला
पार्थ पवार याच्या मालकीच्या अमेडिया कंपनीने महार वतन जमीन खरेदी केली
महार वतन जमिनीचा व्यवहार करता येत नाही, जमीन विकली गेल्यास सरकारला नजराणा भरावा लागतो हया व्यवहारात नजराणा भरला नाही
कागदोपत्री हा व्यवहार शीतल तेजवानी हिच्या पॅरामाऊंट इन्फ्राष्ट्रॅक्चर कंपनी सोबत झाला असल्याचे भासविले तरी प्रत्यक्षात पार्थ पवार याच्या अमेडिया कंपनीने मूळ गायकवाड आणी 274 जमीन मालक महार वतनदारा सोबत खरेदी खत नोंदविले आहे
या व्यवहारात आर्थिक देवाण- घेवाण, चेक, NEFT व्यवहार किंवा बँक पुरावे खरेदी खत, नोंदणी दस्तावेजात जोडले गेले नाही त्या मुळे हया व्यवहाराच्या सत्यतेवर प्रश्न निर्माण होतो
जमिनीची खरेदी करताना आय टी पार्कच्या नावाखाली सरकारकडून स्टॅम्प ड्युटी माफी मिळविली
संबंधित अमेडिया कपंनीला कोणताही पूर्वानुभव नसताना देखिल सरकारी सवलत, स्टॅम्प ड्युटी माफी कश्या मिळाल्या
अमेडिया एंटर प्राइजेस कंपनीचे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील ( पार्थ पवारांचा मामे भाऊ),
जमीन विक्रीदार कुळ मुखत्यार पत्र धारक शीतल किशनसिंह तेजवानी, सब रजिस्टार रवींद्र बाळकृष्ण तारू, तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे
अमेडिया कंपनीचे मुख्य भागीदार पार्थ अजित पवार याचे विरोधात गुन्हा दाखल झाला नाही त्या मुळे संताप व्यक्त होत आहे
कोरेगाव पार्कची 40 एकर महार वतन जमीन पुण्यातील शीतल तेजवानी हिच्या परामाऊंट इफ्रांस्टॅक्चर कपंनीने घेतली या जमिनीच्या 273 मालकाकडून महार वतन धारकांकडून कधीही रद्द न होणारी पॉवर ऑफ अंटर्णीसोबत विक्रीचे अधिकार देखिल घेण्यात आले 2006 सालात हे सगळे व्यवहार पूर्ण करण्यात आले त्या नंतर तब्बल 19 वर्षा नंतर अमेडियाने ही जमीन खरेदी केली
अमेडिया कंपनी वाहन दुरुस्ती, मोटर सायकल विक्री,घरगुती वापराचे सामान विक्रीच्या व्यवसायात आहे आय टी उपक्रमाशी काहीही संबंध नाही तरी स्टॅम्प ड्युटी माफी मिळविली