logo

शिवसेना उबाठा गटाचे मा. बबन भाऊ उरकुडे यांची चिंचोली खुर्द येथे सदिच्छ भेट .

आज दिनांक 07/11/25 ला ठिक 8=00. वाजता मा. बबन भाऊ उरकुडे शिवसेना उबाठा गटाचे उप जिल्हा अध्यक्ष यांनी चिंचोली खुर्द गावात भेट दिली.
या भेटीदरम्यान त्यांनी यावर्षी झालेल्या पूर परिस्थिती, सतत पडणाऱ्या पावसाने शेतकरी पूर्णपणे खचून गेल्याने गावातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या . शेत् कऱ्याविषयी शासन किती निर्लज्ज आहे. याविषयी गावकऱ्यांना पटवून दिले.
शिवाय wcl च्या उर्वरीत 20% राहिलेल्या जमिनीविषयी समस्या शेतकऱ्यांनी उपस्थित केली. यावर मा. बबन भाऊ उरकुडे यांनी सकारात्मक भूमिका घेतली. यामुळे गावातील शेकडो गावकरी त्यांच्या पाठीशी उभे राहिले.
तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धारही गावकऱ्यांनी घेतला.

0
66 views