logo

उबाठाचा कांगावा

उबाठाचा कांगावा
मनपा निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात यासाठी राज ठाकरे यांनी पुढाकार घेत " सत्याचा मोर्चा " काढला
या मोर्चाच्या सभेत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात काढरे ते कापड असा हुकूम सोडून गाडीभर पुरावे, दुबार मतदारांची यादी दाखविली काही मोजक्या मतदार संघातील दुबार मतदारांची नावे, पत्ते वाचून दाखविले
आता पाळी होती उद्धव ठाकरे यांची त्यांनी गाडीभर पुरावे दाखविले नाही परंतु एक पत्राचा कागद दाखविला व त्यातील मजकूर समजावून सांगितला एका कुटुंब प्रमुखांने निवडणूक आयुक्ताच्या " सक्षम " ऍप वर ऑनलाईन अर्ज करून पती, पत्नी, दोन आपत्ये अशी मिळून चौघाची नावे मतदार यादीतून वगळण्याची विनंती केली यात महत्वाची बाब म्हणजे तो कुटुंब प्रमुख दुसरा, तिसरा कुणी नसून दस्तूर खुद उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीच मोर्चात खुलासा केला
नशीब बळवंत्तर त्या अर्जावरून चौकशी करण्यासाठी शासकीय अधिकारी अर्जाच्या पत्यावर गेली कर्मधर्म योगायोगाने ते अधिकारी वांद्रे शासकीय वसाहतीत राहतात, ओळखीचे निघाले अन्यथा उद्धव म्हणतात
उद्धव बाळासाहेब ठाकरे
सौ रश्मी उद्धव ठाकरे
आदित्य उद्धव ठाकरे
तेजस उद्धव ठाकरे, अशी चौघाची नावे मतदार यादीतून वगळली गेली असती
उद्धव ठाकरे मागणी करीत आहे माझ्या कुटुंबाची नावे वगळण्या मागे कोण आहे, कुणाचा डाव आहे, काय डाव आहे याची खटाराजमा झाली पाहिजे, चौकशी झाली पाहिजे उद्धव यांची मागणी रास्त आहे
एकेकाळी " मातोश्री " गजबजलेली असायची माँ साहेब मीनाताई ठाकरे असे पर्यंत मातोश्री
शिवसैनिकांचे आश्रय स्थान, पवित्र स्थान म्हणून ओळखले जात असे
शिवसेना नेत्यांच्या बैठका, गाठीभेटी
मातोश्री चोवीसतास बहरलेली असायची
तिन्ही सुना नातवंडे बाळासाहेबांचे सेवेकरी, अंगरक्षक, त्यांचे पी ए असा लवाजमा असायचा माँ साहेब मीनाताई गेल्यानंतर मातोश्रीची रया गेली आज मातोश्री मध्ये एकमेव उद्धव व त्यांचे कुटुंब अशी अवघी चार माणसे राहतात
जयदेव पती पत्नी विभक्त झाले मोठ्या सूनबाई स्मिता ठाकरे मुलाला घेऊन वेगळ्या राहतात बाळासाहेबांचे द्वितीय चिरंजीव बिंदू याच्या कुटुंबाला बेदखल केले बिंदूची पत्नी मुलगा निहार वेगळे राहतात
बाळासाहेबांचा सेवक चंपा थापाला देखिल मातोश्री बाहेर काढले
उद्धव आणी त्यांच्या कुटुंबाची नावे वगळण्याचे कट कारस्थान कुणाचे, ऑनलाईन अर्ज कुणाचा, फेक मोबाइल फोन नंबर कुणाचा हा सर्वस्वी फौंजदारी गुन्हा आहे हा तथाकथित ऑनलाईन अर्ज 23 ऑकटोबर रोजीचा आहे खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला पाहिजे होता ती जबाबदारी उद्धव यांचीच आहे
कदाचित बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्त्यपत्रावर निर्माण झालेला वाद, कोर्टात मृत्युंपत्राला दिलेले आवाहन अशी कौटुंबिक कलहाची पश्वभूमी असल्या मुळे कदाचित पोलीसात प्रकरण गेले नसावे परंतु
सत्याच्या मोर्चात हे प्रकरण उपस्थित करणे देखिल योग्य नाही, त्याचा राजकारणात वापर करणे हेही योग्य नाही असला कांगावा थांबवावा अशी अपेक्षा
तानसेन ननावरे
युनायटेड रिपब्लिकन्स
9987789015

8
4465 views