logo

जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेची बैठक संपन्न .. पदोन्नतीच तर कमी करून पदनाम बदलणे व वेतन त्रुटीवर विस्तृत चर्चा...

विशेष प्रतिनिधी( शिवाजी श्रीमंगले )
जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना
( मान्यता प्राप्त ) शाखा - जिल्हा लातूरची बैठक डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सभागृह जिल्हा परिषद लातूर येथे राज्याचे अध्यक्ष श्री अशोक डहाळे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 02 /11/25 रोजी उत्साहात पडली. बैठकीस संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष शरद बिरादार राज्यसचिव आनंद भिसे मराठवाडा विभागीय संपर्कप्रमुख चंद्रकांत हवा जिल्हाध्यक्ष सुजित कमलापुरे उपस्थित होते.
बैठकीत जिल्हा परिषद लिपिक व लिपिकेत्तर कर्मचारी यांच्या चौथ्या वेतन आयोगापासून वेतनात असलेली वेतनत्रुटीतील तफावत दूर करणे व पदोन्नतीस्तर कमी करून पदनामात बदल करणे आणि त्यास नवीन वेतनश्रेणी लागू करणे तसेच 2005 नंतर नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना जशास तशी जुनी पेन्शन लागू करणे याबाबत *दिनांक 14 व 15 ऑक्टोबर 25 रोजी आझाद मैदान मुंबई* येथे झालेल्या उपोषणावर विस्तृतपणे चर्चा करण्यात आली.
यावेळी शासनाने स्थापन केलेल्या खुल्लर समितीकडून राज्यातील जि. प. लिपिकावर झालेला वेतन त्रुटीतील अन्याय दूर करून वरील मागण्या तात्काळ लागू करण्यात याव्यात याबाबतीत येत्या हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे राज्यातील लिपील कुटुंबासह आक्रोश मोर्चा काढणार असल्याचे ठरविले.
जि. प. मुख्यालय,जिल्हा व तालुका कार्यकारणीत विविध पदावर नियुक्त झालेल्या नूतन पदाधिकारी यांना राज्याचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष व सचिव यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
बैठकीस हिरागीर गिरी, सचिन कुलकर्णी, राजकुमार पुरी,रजाक बागवान,सतीश कोटमाळे,राजेंद्र नरवाडे,विद्या पंडित,शुभांगी शिंदे,वर्षा भगत,कविता तांबारे,बबीता चित्तलवाड,स्वाती बिराजदार,संध्या होंदरने,संतोष किनगावकर, मंगेश काळे, दयानंद राठोड, किरण मुडपे ,बालाजी भोसले,संग्राम भिंगोले,संग्राम भुरे, सचिन गुंडरे, प्रदीप भोसले, विजयकुमार सूर्यवंशी,रिजवान दायमी , भातांबरेकर भानुदास, विशाल जाधव,लक्ष्मण राठोड, सचिन बावगे,बाळू सुरवसे, गोविंद जाधव,आदी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

3
6 views