logo

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुन्हा लांबणीवर; मतदार यादी अंतिम करण्यास मुदतवाढ

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुन्हा लांबणीवर

मतदार यादी अंतिम करण्यास मुदतवाढ

लोककल्याणार्थ, परंडा:

राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी अंतिम करण्याच्या कार्यक्रमाला मुदतवाढ दिल्याने, या निवडणुका आता पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. यापूर्वी डिसेंबर अखेरपर्यंत निवडणुका पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र आता या निवडणुका पुढील वर्षी जानेवारी महिन्यात होण्याची चिन्हे आहेत. मुदतवाढीमुळे निवडणूक कार्यक्रम बदलला. सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका ३१ जानेवारीपर्यंत संपवण्याच्या सूचना दिल्या असल्या, तरी आयोगाने मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमात बदल केला आहे.
नगरपरिषद निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये संपवून, डिसेंबर अखेरपर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पूर्ण होतील अशी शक्यता होती. राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमाला १२ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या मुदतवाढीमुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका थेट पुढील वर्षी जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सूत्रांनुसार, आयोगाच्या या निर्णयामुळेप्रशासकीय ताण हे अप्रत्यक्ष कारणनिवडणुका लांबणीवर जाण्यास राज्यात अनेक जिल्ह्यांत झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे वाढलेला प्रशासकीय कामांचा ताण हे एक महत्त्वपूर्ण अप्रत्यक्ष कारण मानले जात आहे. अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासकीय यंत्रणा सध्या पंचनामे आणि नुकसान भरपाई वाटपाच्या कामात पूर्णपणे गुंतली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे वाढलेला प्रशासकीय कामांचा ताण हेच निवडणूक लांबणीवर जाण्याचे एक कारण असल्याचे बोलले जात आहे.आता जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणुकीची अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे. प्रशासकीय यंत्रणेवरील ताण कमी होईपर्यंत आणि मतदार याद्या अंतिम होईपर्यंत आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांना व कार्यकर्त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे

5
633 views