
तुमसर नगरपरिषद निवडणुकीत चर्मकार समाजाचा ‘अण्णा’ आणि ‘राकेश’ यांना जाहीर पाठिंबा! आहे
तुमसर नगरपरिषद निवडणुकीत चर्मकार समाजाचा ‘अण्णा’ आणि ‘राकेश’ यांना जाहीर पाठिंबा!
🔹चर्मकार समाज सेवा संघाचा निर्णायक पवित्रा; स्थानिक राजकारणात नवा कलाटणीबाबत चर्चा सुरू
तुमसर : आगामी तुमसर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्मकार समाजाने एक अत्यंत निर्णायक भूमिका घेतली आहे. चर्मकार समाज सेवा संघ, रविदास नगर तुमसर यांनी आनंद उर्फ अण्णा राजेश मालाधारे आणि राकेश राजकुमार झाडेकर या दोन उमेदवारांना जाहीर आणि ठाम पाठिंबा घोषित केला आहे. या महत्त्वपूर्ण राजकीय निर्णयामुळे तुमसरमधील स्थानिक राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, चर्मकार समाजाचा संघटित मतदारवर्ग निवडणुकीत 'किंगमेकर' ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
एकजुटीने पाठिंब्याची घोषणा
चर्मकार समाज सेवा संघाच्या वतीने माजी अध्यक्ष सुरेश ईशतारु कनोजे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत हा पाठिंब्याचा निर्णय सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यावेळी संघाचे . सचिव रणजीत नथू तांडेकर, सहसचिव अमृत ईशतारु कनोजे, तसेच सदस्य तुलसीदास केवला मराठे, मेथू अशोक कनोजे, विकास हरिराम मराठे यांच्यासह समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत मनीष कनोजे, शिवकुमार मराठे, दुर्गेश बर्वेकर, गोविंद भांडेकर, कैलास बर्वेकर, दुर्गेश कनोजे, शर्मानंद बर्वे, किशोर मलाधारे, विलास कनोजे, नाशिक कनोजे, वासू बर्वेकर, नटराज भांडेकर, रोहित मालाधारे, अर्जुन मालाधारे, अतुल कनोजे, नंदकिशोर मराठे, रोहित बर्वेकर, मनोज जगनीत यांच्यासह युवक, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचीही लक्षणीय आणि उत्स्फूर्त उपस्थिती होती.
“नेतृत्वावर विश्वास – विकासाचा संकल्प”
पाठिंब्याच्या घोषणेवेळी समाजाने आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. अण्णा मालाधारे आणि राकेश झाडेकर हे समाजहित, सर्वसामान्यांचे प्रश्न आणि पारदर्शक व लोकाभिमुख कार्यासाठी सातत्याने आवाज उठवणारे व्यक्तिमत्त्व असल्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
माजी अध्यक्ष सुरेश ईशतारु कनोजे यांनी जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करताना सांगितले की, "चर्मकार समाज सेवा संघ या दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. समाजाच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या आणि प्रामाणिक प्रतिमेच्या उमेदवारांना आम्ही समर्थन देणार आहोत."
निवडणुकीत चर्मकार समाज ठरणार ‘किंगमेकर’?
तुमसर नगरपरिषदेच्या निवडणुकीत चर्मकार समाजाची मतसंख्या चांगली आहे. समाज सेवा संघाने घेतलेल्या या सूत्रबद्ध आणि संघटित मतदानाच्या निर्णयामुळे निवडणुकीच्या निकालावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसांत इतर राजकीय पक्ष आणि पॅनेल्सकडूनही चर्मकार समाजाची मर्जी संपादन करण्यासाठी मोठी धडपड सुरू होईल, हे निश्चित मानले जात आहे.
या घडामोडींमुळे तुमसर नगरपरिषद निवडणुकीचे राजकारण अधिक रंगतदार झाले असून, चर्मकार समाजाच्या पुढील हालचालींवर सर्वच उमेदवारांचे आणि राजकीय पक्षांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. आ