logo

पुसद तहसील कार्यालयात पुन्हा नागरिकांची लूट — अभिलेख कक्षातील अधिकारी उघडपणे घेत आहेत जास्तीचे पैसे!

पुसद तहसील कार्यालयात पुन्हा नागरिकांची लूट — अभिलेख कक्षातील अधिकारी उघडपणे घेत आहेत जास्तीचे पैसे!

ठिकाण: तहसील कार्यालय, पुसद (जिल्हा यवतमाळ)
व्हिडिओ पुरावा: अभिलेख कक्षात नागरिकांकडून जबरदस्तीने जास्तीचे पैसे उकळले जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल

पुसद तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षात भ्रष्टाचाराचे खुलेआम व्यवहार सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
संबंधित सहाय्यक महसूल अधिकारी जय राठोड हे नागरिकांकडून प्रत्येक दस्तऐवज ५० रुपये आकारत असल्याचे स्वतः व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगताना दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये अधिकारी स्वतः म्हणताना ऐकू येतं

स्वतः कर्मचारी हे सांगत आहे व्हिडिओमध्ये आम्ही प्रत्येकांकडून 50 रुपये घेतो
पण शासन निर्णयानुसार,
ग्रामीण भागातील दस्तऐवज शुल्क फक्त ५ रुपये आहे,
आणि
शहरी भागासाठी १० रुपये शुल्क अनुज्ञेय आहे.

मात्र या अधिकाऱ्यांकडून नागरिकांकडून थेट ५० रुपये उकळले जात आहेत —
तेही तहसीलदार महादेव जोरवर यांच्या आशीर्वादाने हे सुरु असल्याचा नागरिकांचा गंभीर आरोप आहे.

या प्रकारामुळे तहसील कार्यालयात येणाऱ्या सामान्य नागरिकांमध्ये संताप पसरला आहे.
दररोज शेकडो नागरिकांकडून होणारी ही उघड लूट आता लोकांनी कॅमेऱ्यात कैद करून प्रशासनापुढे ठेवली आहे.

नागरिकांचा सवाल —
“शासनाचे नियम वेगळे आणि तहसील कार्यालयाचे नियम वेगळे का?”
“अधिकारी खुलेआम लूट करत असताना प्रशासन गप्प का आहे?”


सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांची मागणी:
या प्रकरणात तात्काळ चौकशी करून
सहाय्यक महसूल अधिकारी जय राठोड यांना निलंबित करावे,
आणि
तहसीलदार महादेव जोरवर यांची भूमिकाही तपासावी.

4
513 views