logo

साखरखेर्डा-दुसरबीड रोडवर भीषण अपघात : दोन तरुणांचा जागीच मृत्यू सातबारा हॉटेलसमोर उड्डाणपूलाजवळ रात्री घडली दुर्दैवी घटना

प्रतिनिधी जुबेर शाह

साखरखेर्डा ;साखरखेर्डा-दुसरबीड रोडवरील दुसरबीड उड्डाणपूलाजवळ काल (शुक्रवार) रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका जबरदस्त होता की दुचाकीचे तीन तुकडे झाले, तर घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता.

मृतांमध्ये शेख आरिफ शेख कादर (वय ३५) आणि शेख अल्ताफ शेख अक्रम (वय २८, दोघेही रा. साखरखेर्डा) यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे दुसरबिड येथे एका विवाह सोहळ्याला (रिसेप्शनला) गेले होते. कार्यक्रम संपवून साखरखेर्डाकडे परतत असताना त्यांच्या दुचाकीने (क्रमांक MH-28 BJ-4029) सातबारा हॉटेलसमोर असलेल्या दुभाजकावर जोरात धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले.

या घटनेने साखरखेर्डा परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, नागरिकांकडून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

52
26 views