ओमकार साई बाल संगोपन केंद्राचा 9 वा वर्धापन दिन सोहळा
डोंबिवली : ओमकार साई सामाजिक, बहुउद्देशीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा संस्था.(बाल संगोपन केंद्र) डोंबिवली या संस्थेने आपल्या वर्धापन दिना निमित्त दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ रोजी समाजातील सामाजिक, राजकिय, क्रिडा, शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि कला क्षेत्रा मध्ये काम करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित केल तसेच छोट्या व्यावसायिकांना आपली ओळख करण्याकरिता योग्य व्यासपिठ मिळवून दिले.
ओमकार साई बाल संगोपन केंद्र ह्या संस्थेचे अध्यक्षा सौ. सुविधा दांडेकर (माई) तसेच संचालक श्री. अनिकेत हिंदळेकर श्री.राकेश भोने, अर्चना लांडगे, श्री.उदय वेळासकर व इतर सदस्य हे एकल पालकत्व असलेल्या मुलींचे जे आर्थिक दृष्ठ्या मागासलेले असतात म्हणून ते आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकत नाहीत अश्या मुलांचे शिक्षण ह्या संस्थेच्या माध्यमातून पूर्ण केले जाते.
वर्धापन दीना निमित्त सामाजिक तसेच औद्योगिक क्षेत्रातील मान्यवारांनी संस्थेला शुभेच्छा दिल्या आहेत.
धन्यवाद....