
बच्चु कडु यांच्या समर्थनार्थ
शेतकरी कर्जमाफीसाठी महाविकास आघाडीचा मोताळा येथे रास्तारोको
मोताळा :-शेतकऱ्यांच्या कर्जमाफी सह विविध मागण्या घेऊन बच्चु कडु नागपुरात हजारो शेतकऱ्यांसह आंदोलन करत आहे. त्या आंदोलनाला समर्थन म्हणून मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता करण्यात यावी या प्रमुख मागणीसह अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आज मोताळा येथे मलकापुर - बुलढाणा रोडवर चक्काजाम करुन भर रस्त्यावर टाळ मृदंगाच्या गजरात भजन आंदोलन करत सरकारच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला.
त्याबाबद सविस्तर असे की,गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.त्याला शासनाने कुठल्याच प्रकारची मदत न करता फक्त तोंडाला पानं पुसण्याचे काम केले आहे. एकीकडे शेतकरी आसमानी संकटाचा सामना करत असतांना महायुती जाहिरनाम्यात जे कर्जमाफी करुन शेतकऱ्याचा सातबारा कोरा करु हे आश्वासन देऊन सत्तेतवर आली त्याच आश्वासनावरुन सरकार वेळ काढुपणा करत आहे. त्या आश्वसानाची पूर्तता करुन शेतऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करा या मागणीसाठी आज शेतकरी रस्त्यावर उतरून त्यांनी चक्का जाम आंदोलन केले. दिलेल्या निवेदनातील मागण्या पुढील प्रमाणे कुठल्याही अटी शर्ती न ठेवता सरसकट सातबारा कोरा करा,सोयाबीन कापूस मका यांची शासकीय खरेदी केंद्र सुरु करा,शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत योग्य भाव द्या,दुधाचे दर वाढवा,पेरणी ते कापनीचा खर्च रोजगार हमीतुन करा अशा विविध मागण्या दिलेल्या निवेदनातुन करण्यात आल्या.
त्यावेळी डॅा.शरद काळे,सुनिल कोल्हे,शुभम घोंगटे,अमोल देशमुख,प्रेमलता ताई सोनोने,मिलिंद जैस्वाल,विजय इंगळे,निलेश सोनोने,संजय खाकरे,अमर कुळे,श्रीकृष्ण बांगर,जमीर दादा,योगेश महाजन,उमेश राजपुत, राजेश पुरी गुरूदेव भजनी मंडळ आव्हा व अनेक शेतकरी उपस्थित होते.