logo

पाचोरा भडगावात शत प्रतिशत भाजपाच

पाचोरा भडगावात शत प्रतिशत भाजपाच.....!
पाचोरा प्रतिनिधी
(जिल्हाध्यक्ष किरण अशोक सुर्यवंशी)
दि. 30 ऑक्टोबर 2025
आज पाचोरा येथे पाचोरा व भडगाव तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या संघटनात्मक तयारी संदर्भात प्रमुख नेत्यांची बैठक राधेश्याम चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत पाचोरा आणि भडगाव नगरपालिकेच्या प्रभाग निहाय इच्छुक उमेदवारांचे पर्याय, पक्षाची संघटनात्मक स्थिती, निवडून येण्याची क्षमता आदी विषयांवर प्रभागनिहाय,गट-गण निहाय विस्तृत चर्चा करण्यात आली.

तालुक्यातील प्रमुख नेते ,जिल्हा पदाधिकारी व मंडळ अध्यक्ष या सर्व रचनेमध्ये उत्तम समन्वय राहण्यासाठी उपाययोजना यावर चर्चा झाली. भाजपाचे सर्व प्रमुख नेते पदाधिकारी व कार्यकर्ते माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वामध्ये एक दिलाने ,पूर्ण ताकदीने कार्यकर्त्यांच्या या निवडणुकीमध्ये झोकुन देऊन पक्षाला दैदिप्यमान यश मिळवून देण्यासाठी काम करतील असा संकल्प सर्वानुमते करण्यात आला .लवकरच मा ना गिरीश भाऊ महाजन,खा स्मिताताई वाघ व आ मंगेशदादा चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात येणार आहे .

या बैठकीस राधेश्याम चौधरी,माजी आमदार दिलीप भाऊ वाघ ,अमोल शिंदे ,वैशालीताई सूर्यवंशी ,प्रताप नाना पाटील,संजय वाघ, मधुकर काटे, सुभाष मुंडे पाटील, अमोल नाना पाटील, सोमनाथ पाटील ,डॉक्टर शांतीलाल तेली ,गोविंद शेलार ,अनिल पाटील,विनोद नेरकर, डी डी पाटील सर ,संदीप जैन आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

18
569 views