logo

मनपाच्या आरोग्य विभागातील समायोजन पद्दत 'वांझोटी'



यवतमाळ:- लेखा तत्वांचे अचूकता आणि पालन सुनिश्चित करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या विवरणामध्ये आवश्यक बदल करणे म्हणजेच समायोजन !
आणि हे समायोजन एस. आय. प्रशांत गावणेर ह्यांनी विषयाला बगल देऊन समायोजनाला आर्थिक लुटमारीचा केंद्रबिंदू बनविला आहे. मनपाच्या स्वच्छता विभागातील वाहनातील समायोजन पद्दत 'वांझोटी'असल्याचा आरोप पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे ह्यांनी केला आहे.

समायोजन पद्धतीमध्ये डीझल सप्लाय बुक न वापरता आणि वाहन लेखा, काम लेखा, सप्लाय स्लिप बुक न भरता नियमबाह्य पद्धतीने स्वच्छता विभागाचे एस.आय.प्रशांत गावणेर ह्यांनी लेखा परिक्षनाकरिता वाहनचालकांचे लॉकबुक ऑडिट केले नाही. मनपाची आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी मनपा स्वच्छता विभागाची ऑडिट करण्याची मागणी आता केली जात आहे.
एस.आय.प्रशांत गावणेर यांनी मार्जितल्या पेट्रोल पंपावर तीन कर्मचारी निव्वळ येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांचे इंधन बिल जमा करण्यासाठी नेमले आहे. निलेश मंडे(कुली), शाहू जवंजाळ (ड्रायव्हर),दशरथ काकड (ड्रायव्हर) हे प्रशांत गावणेर ह्यांच्या सांगण्यावरून खोटे बिले जमा करून गावणेर ह्यांना सादर करतात.
प्रशांत गावणेर ह्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मलिंदा मिळत असल्यामुळे त्यांनी खुश होऊन शाहू जवंजाळ ह्यांना एस.आय.बनविले, तर निलेश मंडे ह्यांना त्यांच्या पसंतीनुसार कंपोस्ट येथे बदली करण्यात आली.
कर्मचाऱ्यांनी कुठे काम केले ह्यांचा GPS व्दारे पुरावा गावणेर साहेबांना द्यावा लागतो. मग इंधनाची किती उचल केली ह्याकरिता गावणेर ह्यांना GPS पद्दत लागू नाही का?
मनपाच्या कुठल्या वाहनात किती इंधन भरले ह्याची छायांकित प्रत जोडून समायोजन केल्या जात नाही आणि का केल्या जात नाही ? असे अनुत्तरीत प्रश्न कायम आहे.
ह्यामागील कर्ता आणि करविता,बोलविता धनी कोण ?
हा एक संशोधनाचा विषय झाला आहे. त्यादृष्टीने तपास चक्रे फिरविणे गरजेचे झाले आहे.
सदर हा आर्थिक गोरख धंदा वरिष्ठांच्या आशीर्वादाने सुमारे दोन वर्षांपासून सुरू आहे. ह्यावरून असे निदर्शनास येते की, सदर कामात पारदर्शकता दिसून येत नसल्याचा आरोप पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे ह्यांनी केला आहे.

*बॉक्स*

शहरातील घनकचरा व्यवस्थापन व अस्वच्छतेवर नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. अमरावती मनपाचा प्रशासकीय कारभार पुरता ढेपाळला असून वरिष्ठांनी फक्त कर्मचारी वसुलीसाठी नेमल्याचे दिसून येत आहे. स्वच्छतेसाठी कमी मनुष्यबळ लावण्यात आल्याने शहरात सर्वत्र अस्वच्छता पसरली असून जागोजागी कचऱ्यांचे ढिगारे पडून आहेत.
वसुली करून देणाऱ्या कर्मचाऱ्यास प्रमोशन तर प्रामाणिक काम करणाऱ्या कंत्राटी कामगाराचे नियमितपणे वेतन सुद्दा देण्यात येत नसल्याचा आरोप कामगारातुन करण्यात येत आहे. त्यामुळे मनपा आयुक्त यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
फक्त स्वतःच्या गरजा, इच्छा आणि ध्येये पुर्ण करण्यासाठी मनपात चालत असलेल्या आर्थिक भ्रष्टाचारात मोठं-मोठे मासे गळाला लागण्याची दाट शक्यता वर्तविल्या जात आहे.

*बॉक्स*

एस.आय.प्रशांत गावणेर (स्वच्छता विभाग) हे मनपाचे प्रचंड प्रमाणात आर्थिक लूट करीत असून विकास कामाला बाधा आणून शासनाच्या तिजोरीला चुना लावत असून त्यांच्या आर्थिक लुटीची योग्य ती चौकशी करून त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करून व वसुली करून सेवेतून निलंबित करण्याची मागणी पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे ह्यांनी निवेदनाव्दारे पालकमंत्री, आजी/माजी आमदार, खासदारासह राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब ह्यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून न्यायाची मागणी केली आहे. ह्यावर मनपा आयुक्त साहेबा काय कारवाई करतात, ह्याकडे समस्त मनपा कर्मचारी तथा अमरावती नगरवासीयांचे लक्ष लागले आहे.

1
47 views