logo

सेवाभावी अजय भिमटे ची मोहपा वर कमळ छाप जनतेच्या मनात रुजलेल्या निस्वार्थ कार्यातून नवा राजकीय अध्याय

नागपूर:कळमेश्वर

मोहपा, दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ – "सेवा हीच खरी राजनीति" या उदात्त विचाराला मूर्त रूप देत मोहपा शहरातील अजय भाऊ भिमटे यांनी समाजकारणाचा एक नवा आणि प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. निःस्वार्थ भावनेने केलेल्या कार्यामुळे त्यांनी आज सामान्य नागरिकांच्या मनात एक विशेष स्थान मिळवले आहे.
रुखमाई ॲम्बुलन्स सर्विसेसच्या माध्यमातून त्यांनी मोहपा व परिसरातील नागरिकांसाठी दहा किलोमीटरपर्यंत पूर्णपणे मोफत ॲम्बुलन्स सेवा सुरू केली आहे. ही सेवा खऱ्या अर्थाने जीव वाचवणारी ठरली आहे. अनेक गरजू आणि आपत्कालीन स्थितीत असलेल्या नागरिकांना या उपक्रमामुळे तत्काळ मदत मिळाली असून, त्यांच्या या सेवाभावाबद्दल नागरिकांकडून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
रुग्णसेवेचा आधार
अजय भाऊ भिमटे हे केवळ राजकीय इच्छुक नाहीत, तर ते रुग्णसेवा, सामाजिक बांधिलकी आणि सर्वसामान्यांच्या वेदनांना स्पर्श करणारे एक खरे समाजसेवक म्हणून ओळखले जातात. गरजूंसाठी औषधोपचाराची मदत असो, रुग्णवाहिकेची तत्पर उपलब्धता असो किंवा समाजातील वंचित घटकांसाठी आरोग्य जनजागृती अभियान – त्यांनी प्रत्येक वेळी स्वतःला लोकांच्या सेवेसाठी समर्पित ठेवले आहे.
मोहपा शहरातील एका नागरिकाने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “गरजेच्या वेळी अजय भाऊंनी कोणताही विचार न करता मोफत ॲम्बुलन्स दिली. त्यांच्या कामातून सेवाभाव दिसतो, राजकारण नाही.”
राजकारणात सेवाभावाचे कमळ
राजकारणात प्रवेश करण्यामागे त्यांच्या मनात कोणताही स्वार्थ नसून “समाजसेवा हीच खरी शक्ती” या शुद्ध भावनेतून ते आता पुढचे पाऊल टाकत आहेत. अजय भाऊ भिमटे आता प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कमळ चिन्हावरून उमेदवारी करण्याच्या तयारीत आहेत.
नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल असलेले प्रेम, विश्वास आणि त्यांच्या निःस्वार्थ सेवेचा अनुभव पाहता, मोहपा शहराच्या राजकारणात कमळ उमलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. त्यांचे नेतृत्व प्रभाग ३ मधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नवी आशा घेऊन येईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

62
10379 views