आंतरराष्ट्रीय फेक कॉल सेंटर रॅकेटचा पुणे क्राईम ब्रँच कडून पर्दाफाश
पुणे: २८ ऑक्टोबर
पुणे गुन्हे शाखेने आंतरराष्ट्रीय फेक कॉल सेंटर रॅकेट उघडकीस आणले आहे. या टोळीमार्फत परदेशी नागरिकांना अमेरिकन पोलिस किंवा बँक अधिकारी म्हणून ओळख देत क्रिप्टोकरन्सीद्वारे पैसे उकळले जात होते.
गुन्हेगारांनी शहरातील काही ठिकाणी कॉल सेंटर सुरू करून ३०-४० तरुणांना “कस्टमर सपोर्ट” म्हणून कामावर ठेवले होते. दरमहा ₹२ ते ₹३ कोटींचा सायबर स्कॅम होत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
सायबर क्राइम युनिटने संगणक, मोबाईल, लॅपटॉप आणि क्रिप्टो वॉलेट्स जप्त केले आहेत. पोलिसांच्या मते, हे रॅकेट आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी गटांशी जोडलेले असू शकते.
दरम्यान पुणे गुन्हे शाखेकडून अवाहन करण्यात आले आहे की अनोळखी परदेशी कॉलवर वैयक्तिक माहिती देऊ नये. संशयास्पद कॉल आल्यास सायबर हेल्पलाइन 1930 वर संपर्क साधावा.