logo

सामनेर कोलार नदी पुनर जीवन प्रकल्प निधी उपलब्ध आमदार आशिष देशमुख यांचे आश्वासन

*सावनेर कोलार नदी पुनर्जीवन प्रकल्पास निधी उपलब्ध करून देण्याबाबत पंकजा मुंडे यांची आज दिनांक 28 रोजी आमदार आशिषराव देशमूख यांनी मंत्रालयात भेट घेऊन निवेदन सादर केले*

*सावनेर कोलार नदीचे पुनरुज्जीवन संदर्भात मंत्री पंकजा मुंडे यांचा सकारात्मक प्रतिसाद सह निधी उपलब्ध करुन देण्याचे जननेता, आमदार डॉ. आशिषराव देशमुखांना आश्वासन*

*

सावनेर नगरितील अत्यंत महत्वाची कोलार नदीला पूर्णपणे प्रदूषण मुक्त करून बारमाही स्वच्छ जलप्रवाह आणि एक जिवंत समृद्ध पर्यावरण युक्त नदीचं वास्तविक रूप प्रदान करण्याच्या उद्देशाने आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी आज 28 ऑक्टोबर रोजी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची मंत्रालयात भेट घेऊन सावनेर कळमेश्वर तालुक्यातून वाहणाऱ्या कोलार नदीच्या सावनेर नगरपरिषद क्षेत्राअंतर्गत वाहणाऱ्या 5 की. मी. प्रवाह मार्गाचे, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NEERI) नागपूर यांच्या सहयोगाने नियोजित कोलार नदी पुनरूज्जीवन प्रकल्पास, महाराष्ट्र राज्य नदी पुनरूज्जीवन प्राधिकरणातर्फे निधी उपलब्ध करून देण्याबाबत भेट घेउन निधी उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन दिले, त्यावर मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली, आमदार डॉ. आशिषराव देशमूख यांनी कोलार पुनरूज्जीवन किती महत्वाचे आहे हे मंत्री पंकजा मुंडे यांना पटवून दिले त्यावर मंत्री पंकजा मुंडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कोलार नदी पुनरूज्जीवन प्रकल्पास तत्वत: मंजुरी देऊन निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले.
शहरातील सामाजिक संघटना समर्पण फाउंडेशन तर्फे वर्ष 2019 मध्ये सुरू करण्यात आलेल्या "कोलार पुनरुज्जीवन अभियान" या मोहिमेला सावनेर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार डॉ आशिषराव देशमुख यांच्या सामर्थ्याची साथ मिळाल्याने एक निर्णायक स्वरूप प्राप्त झालं आहे. आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी अनेक वर्षांपासून दुर्लक्षित कोलार नदी संवर्धनाच्या या अत्यंत महत्त्वपूर्ण व भावनिक विषयाचे महत्त्व जाणून तात्काळ कार्यवाही करत राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थान (निरी) नागपूर, येथे कोलार नदीच्या पुनरुज्जीवन व कोलार नदीची नैसर्गिक परिसंस्था पुनर्संचित करण्याच्या दिशेने योग्य ती उपाययोजना तयार करण्याबाबत निरीच्या उच्चपदस्त अधिकारी व वैज्ञानिकांसोबत मुख्याधिकारी नगरपरिषद सावनेर आणि समर्पण फाउंडेशनच्या सदस्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली होती.यामध्ये कोलार नदी पूर्णपणे प्रदूषण मुक्त करून कशाप्रकारे पुन्हा एकदा तिला स्वच्छ जलधारिणी बनवता येईल यावर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली होती. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहयोगाने निरीच्या तज्ञ वैज्ञानिकांच्या मार्गदर्शनात दीर्घकाळ टिकणारी पर्यावरण पूरक उपायोजना राबवून सावनेर शहरातून पुन्हा एक स्वच्छ समृद्ध पर्यावरण असलेली कोलार नदी प्रवाहित व्हावी अशी इच्छा यावेळी त्यांनी व्यक्त केली. जिव्हाळ्याच्या असलेल्या कोलार नदी संवर्धनाच्या विषयावर लक्ष दिल्यामुळे समर्पण फाउंडेशन व शहराच्या सर्व स्तरावरील नागरिकांकडून आमदार आशिषराव देशमुख यांचे कौतुक करण्यात येत आहे.

28
71 views