बोथी गावाचा अभिमान – सचिन घुगे आणि सहकाऱ्यांची ऊदगीर ते तिरुपती सायकल स्वारी!
*लेखक – नवनाथ डिगोळे, पोलिस न्यूज चाकूर प्रतिनिधी*बोथी गावातील तरुण प्राध्यापक सचिन घुगे हे नाव आज प्रेरणादायी ठरत आहे.लहानपणापासूनच काहीतरी वेगळं आणि समाजाला दिशा देणारं कार्य करण्याची जिद्द त्यांनी उराशी बाळगली. शेतीशी घट्ट नाळ जोडल्यानंतरही त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.अभ्यासाबरोबरच भारूड, नाटक, गायन, व्यायाम आणि धावणे या विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. धावण्याच्या अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी मानाचे स्थान मिळवले असून, शरीरसौष्ठव आणि तंदुरुस्ती यांचा संदेश ते नेहमी देत असतात.सध्या सचिन घुगे हे आपल्या चार सदस्यांच्या संघासह ऊदगीर ते तिरुपती अशी सायकल स्वारी करत आहेत. काही वेळातच ते तिरुपती येथे दाखल होणार आहेत. या प्रवासातून त्यांनी तरुण पिढीला एक सुंदर संदेश दिला आहे —“शरीर तंदुरुस्त असेल तरच मन आणि जीवन निरोगी राहते.”आज आजारपणाच्या वाढत्या छायेत त्यांनी दिलेला हा संदेश प्रत्येकासाठी अनुकरणीय ठरावा असा आहे. बोथी गावाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या या उपक्रमाबद्दल सचिन घुगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा!