logo

राज्यात बाजार समित्यांमध्ये नोकरभरती करण्यास स्थगिती


कोल्हापूर : राज्यातील शेती उत्पन्न बाजार

समित्यांमधील नोकरभरतीला पणन मंडळाने ब्रेक लावला आहे. 'पणन'ने बाजार समित्यांसाठी नेमलेल्या अभ्यास समितीच्या शिफारसीनंतर भरतीबाबत धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे. भरतीसोबतच परंपरागत नियुक्तींनाही मान्यता दिली जाणार नसल्याचे समित्यांना कळवले आहे. राज्यात ३०५ शेती उत्पन्न बाजार समित्या कार्यरत आहेत. अनेक समित्यांमध्ये कर्मचाऱ्यांचे पगारही देता येत नाहीत. शासनाकडून धोरण निश्चित होईपर्यंत परंपरागत नियुक्त्यांसह नवीन भरतीस बंदी घातली आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर या बाजार समित्यांचा समावेश समित्यांचा समावेश राष्ट्रीय बाजारमध्ये करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. मात्र, राज्यातील समावेश होणाऱ्या समित्यांची यादीच तयार झालेली नाही.

66 राज्यातील एकूण सर्व बाजार समित्यांचा यातून काही धोरण करता येते का? यासाठी नोकरभरतील तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. शासन पातळीवर आढावा घेतला जात आहे.

विकास रसाळ, पणन संचालक

29
1250 views