logo

स्टेटस संदर्भात विचारणा करून जातीवाचक शिवीगाळ करत तरुणास बेदम मारहाण ! नांदुरा तालुक्यातील टाकरखेड येथील घटना.

स्टेटस संदर्भात विचारणा करून जातीवाचक शिवीगाळ करत तरुणास बेदम मारहाण !
नांदुरा तालुक्यातील टाकरखेड येथील घटना..

(प्रतिनिधी, बुलढाणा)

नांदुरा :तालुक्यातील ग्राम टाकरखेड येथे दि. 22 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता स्टेटस संदर्भात कारणावरून रोशन सुरेंद्र इंगळे वय 27 या बौद्ध समाजातील तरुणास गावातीलच दोन सवर्ण जातीच्या तरुणांनी बेदम मारहाण केली. रोशन इंगळे हा गावातीलच कैलास जाधव यांच्या किराणा दुकानावर दुपारी एक वाजता किराणा सामान आणण्यासाठी गेला असता किराणा दुकानावरून घराकडे मोटर सायकलने निघताच क्षणी तिथे उपस्थित असलेल्या अजय विनोद जाधव आणि प्रसाद अरविंद जाधव या दोघा तरुणांनी रोशन इंगळे यांची मोटरसायकल अडवत तुझ्या गल्लीतील साहिल उत्तम इंगळे या तरुणांनी त्याच्या मोबाईलवर ठेवलेले स्टेटस दाखवून स्टेटस संदर्भात विचारणा करून याचा काय अर्थ होते असा शिल्लक विषय काढून शिल्लक वाद करण्यास सुरुवात केली. त्यावेळी रोशन इंगळे यांनी मला काही माहिती नाही. अजय आणि प्रसाद यांना सांगितले की माझ्याशी वाद न करता तुम्ही साहिल इंगळे याला त्याचा अर्थ विचारा असे नम्रपणे सांगून सुद्धा अजय जाधव आणि प्रसाद जाधव या दोघांनी रोशन इंगळे याला काठीने बेदम मारहाण केली. व जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. वरील घटनेची माहिती 24 ऑक्टोबर रोजी रोशन इंगळे यांनी बोराखेडी पोलीस स्टेशन जाऊन अजय विनोद जाधव आणि प्रसाद अरविंद जाधव यांच्या विरुद्ध तक्रार
दाखल केली. भारतीय न्याय संहिता बी. एन. एस, 2023, अंतर्गत कलम -118,115,352,352(2),3(5) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक )सन.1989 कलम-3(2) (va), कलम 3(1)(r), 3(1)(s),अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वरील घटनेचा पुढील तपास बोराखेडी पोलीस कर्मचारी करत आहे.

47
1009 views