जगावे समाजासाठी मरावे देशासाठी
चिंचवड येथील 20 वर्षीय मानस दामले या तरुणावर बोन मॅरो आजाराचे गंभीर सावट आले. पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. संकटाच्या या कठीण काळात त्याच्या आईने मदतीचा धागा मावळचे खासदार श्री. श्रीरंग बारणे यांच्या दाराशी आणला.
त्यानंतर दयाळू हात तत्काळ पुढे सरकले. खासदार साहेबांच्या व युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव कु. विश्वजितजी बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना जिल्हाप्रमुख श्री. सागर दत्तात्रय पाचर्णे यांनी स्वतः रुग्णालयात दाखल होत रुग्ण व कुटुंबियांची विचारपूस केली.
रुग्णाच्या वेदनांना आधार देण्याचे, उपचारासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे ठाम आश्वासन त्यांनी दिले. त्यासाठी त्यांनी रुग्णालयाचे ऍडमिन हेड श्री. प्रमोद पाटील यांच्याशी चर्चा करून तातडीने आवश्यक मदत मिळावी यासाठी पुढाकार घेतला.
💐 मरकरी भी जिंदा रहना है तो दुसरो के काम आना