logo

डमी ग्राहकाने मिस कॉल दिला अन् कुंटणखाना उघड झाला..


भर वस्तीतील घरात सुरू होता वेश्याव्यवसाय

कुंटणखान्यावर जळगाव : राहत्या घरामध्ये सुरु असलेल्या पोलिसांनी कारवाई करून दोन महिलांची सुटका केली तर हा कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कारवाई २४ ऑक्टोबर रात्री सावखेडा शिवारात गॅस गोदामाजवळ असलेल्या एका घरात करण्यात आली. या ठिकाणी पाठविलेल्या डमी ग्राहकाने मिस कॉल दिला व कुंटणखाना उघडकीस आला.

सावखेडा शिवारात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्याने डीवायएसपी नितीन गणापुरे यांच्यासह पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अनंत अहिरे, योगिता नारखेडे, पोहेकॉ. धनराज पाटील, प्रवीण पाटील, नरेंद्र पाटील, सचिन साळुंखे, पोकॉ. योगिता पाचपांडे, प्रशांत ठाकूर, मनीषा पाटील यांनी घटनास्थळी येत कारवाई केली.

वेश्याव्यवसायासाठी महिलांना बोलावले घरी

या ठिकाणाहून पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली. त्या जळगाव शहरातीलच वेगवेगळ्या भागातील रहिवासी आहेत. सदर महिलांचा घरमालक महिलेशी संपर्क आला व त्यातून ती महिलांना वेश्याव्यवसायासाठी घरी बोलावू लागली होती.

याच परिसरात यापूर्वीही कारवाई झाली असतानाही पुन्हा हा प्रकार उघडकीस आल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेविरुद्ध शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६च्या कलम ३, ४ व ५ (१) (क) नुसार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक अनंत अहिरे करीत आहेत.

8
836 views