logo

नेचर पार्क वर फटाखामुक्त दीपावली उत्साहात संदेश देणारे आकाशकंदील पणती स्पर्धा यशस्वी विलास केजरकर भंडारा.

प्रेस नोट
लाखनी, भंडारा

नेचर पार्क वर फटाखामुक्त दीपावली
उत्साहात
संदेश देणारे आकाशकंदील पणती स्पर्धा यशस्वी
विलास केजरकर भंडारा.

भंडारा:- लाखनी येथील ग्रीन नेचर फाउंडेशन व ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे पर्यावरणस्नेही दीपावली व नेचर फेस्टीव्हल लाखनी २०२५ च्या निमित्ताने फटाखामुक्त व प्रदूषणमुक्त दीपावलीचा संदेश देण्यासाठी नेचर पार्कवर पर्यावरणसंदेश आकाशकंदील व पणती सजावट स्पर्धांचे आयोजन नेचर पार्क लाखनी बसस्थानकावर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी अत्यंत आकर्षक असे स्वहस्ते तयार केले. पर्यावरणस्नेही दीपावली तसेच फटाखामुक्त व प्रदूषणमुक्त दीपावलीचे संदेश असणारे व वन्यजीव, पक्षी, फुलपाखरे यांचे चित्र असणारे आकर्षक आकाशकंदील तसेच पणती सजावट ह्या दोन्ही स्पर्धा नेचर पार्क लाखनी बसस्थानक येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीपण आयोजित केले.यावेळी विद्यार्थ्यांना पर्यावरणस्नेही तसेच फटाखामुक्त व प्रदूषणमुक्त दिपावली बद्दल उद्बोधक मार्गदर्शन ग्रीन नेचर फाउंडेशनचे कार्यवाह प्रा. अशोक गायधने, अध्यक्ष अशोक वैद्य व पदाधिकारी अशोक नंदेश्वर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
या स्पर्धेचे परीक्षण कृतिशील नगरसेवक संदीप भांडारकर, ग्रीन नेचर फाउंडेशन व ग्रीनफ्रेंडस नेचर क्लबचे पदाधिकारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भैय्याजी बावनकुळे, डॉ. उदय राजहंस, प्राचार्य प्रदीप गायधनी, शिक्षिका वैशाली गायधनी, प्रा. अर्चना गायधने, डॉ. अथर्व गायधने, लाखनी बसस्थानक वाहतूक नियंत्रक श्याम गिऱ्हेपुंजे यांनी केले.तयार केलेल्या आकाशकंदील व पणती सजावटचे प्रदर्शन येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांचे लक्ष वेधून त्यांना खिळवून घेत होते.
अभिनव अशा पर्यावरणसंदेश आकाशकंदील बनवा स्पर्धेत प्रथम क्रमांक लावण्या भजनकर,शुभम नंदेश्वर, आराध्या बोपचे यांना तर द्वितीय क्रमांक ऋणाली बोपचे, योगिनी मळकाम हिला तर तृतीय क्रमांक श्रुती हारगुडे, श्रावणी शेंडे,सना सैय्यद यांना प्राप्त झाला. शालेय गटानुसार प्रथम क्रमांक याशी वंजारी,सृष्टी वंजारी, चारू वैद्य, गुणेश गिऱ्हेपुंजे, श्रावणी सोनटक्के यांना तर द्वितीय क्रमांक दिव्या कुंभलकर,मंथन वैद्य, सौम्या वैद्य यांना तर तृतीय क्रमांक ईशांत वैद्य, काव्या वंजारी, उर्वशी पटले, वेदांती वंजारी, पंकुडी वंजारी, आदि सार्वे यांना प्राप्त झाला. प्रोत्साहनपर क्रमांक आराध्या आगलावे, पूर्वा कोराम, खुशी शहारे, आस्ता गिऱ्हेपुंजे, यश बादशहा गायत्री वैद्य यांना प्राप्त झाला.
अभिनव अशा पर्यावरण संदेश देणारे पणती सजावट स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक उर्वशी पटले, शुभम नंदेश्वर, सृष्टी वंजारी यांना तर द्वितीय क्रमांक सुमती बजाज, योगिनी मळकाम यांना तर तृतीय क्रमांक याशी वंजारी, हर्षिता बोपचे यांना प्राप्त झाला तर प्रोत्साहनपर क्रमांक कृणाली बोपचे, आराध्या बोपचे, आयेशा पाखमोडे यांना प्राप्त झाला. शालेय गटानुसार प्रथम क्रमांक सौम्या वैद्य, मंथन वैद्य, खुशी शहारे यांना तर द्वितीय क्रमांक चारू वैद्य, वेदांती वंजारी यांना तर तृतीय क्रमांक मयंक वंजारी, काव्या वंजारी यांना प्राप्त झाला.या स्पर्धेत समर्थ विद्यालय, राणी लक्ष्मी विद्यालय, महर्षी विद्या मंदिर, युनिव्हर्सल, लिटिल फ्लॉवर, ताजूश शरिया कोचिंग, एम.डी.एन. स्कूल येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी योगेश मस्के, हिमांशु चन्ने, सिद्धी विनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ. मनोज आगलावे, अशोका बिल्डकॉनचे पर्यवेक्षक अभियंता नितीश नागरीकर, देशमुख एक्सरे व सोनोग्राफी क्लिनिक सेंटरचे संचालक डॉ. प्रमोद इमदेव देशमुख, मुंबई येथील पोलिस निरीक्षक नेताराम मस्के, कार्यकारी अभियंता रजत अतकरे व मुख्य कार्यकारी अभियंता ऋतुजा वंजारी, नाना ऑप्टिकलचे नाना वाघाये, डॉ. योगेश गिऱ्हेपुंजे, डॉ. छगन राखडे, रमेश गभने, सोहित गिऱ्हेपुंजे,निर्वाण इलेक्ट्रिक्लसचे भूपेंद्र निर्वाण, सेवानिवृत प्राचार्य अशोक हलमारे व प्राचार्य प्रदीप गायधनी, शिक्षिका वैशाली गायधनी, भैय्याजी कृषक सेवालयचे संचालक भैय्याजी बावनकुळे इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.

RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
All India Media Association
Nagpur District President
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views