
अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे सहकार मंत्री माननीय श्री बाबासाहेब पाटील साहेब यांच्या हस्ते शेतकऱ्यांना किट वाटप.
बालाजी पडोळे & शिवाजी श्रीमंगले ( विशेष प्रतिनिधी ) जन जन की आवाज सोशल मीडिया
अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे 22ऑक्टोबर रोजी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमन श्री तुळशीराम भोसले व सर्व संचालक मंडळ यांच्या माजी सेक्रटरी गोविंदराव सुर्यवंशी यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या . नुतन सेक्रटरी गोविंदराव तांबळगे उपस्थित होते .वतीने चालू बाकीदार सोसायटीचे सभासद शेतकऱ्यांना दिपावली निमित्त फूल नाही फुलांची पाकळी मदत म्हणून पाच किलो साखर किट सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील साहेब यांच्या हस्ते वाटप करण्याचे आयोजन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच साहेबराव जाधव हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब, माजी कार्यकारी अभियंता शुभाषराव पाटील,फिल्ड ऑफिसर अतुल देशमुख, माजी समाजकल्याण सभापती टि.एन.कांबळे,सरपंच मच्छिंद्र वाघमारे,उपसरपंच सुरज बाबासाहेब पाटील,शिवानंद हेगणे, शिवाजीराव देशमुख ,राम नरवटे,पत्रकार राजकुमार सोमवंशी, बालाजी पडोळे,धर्मपाल सरवदे,दिलीप मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीने संस्थासंचालक तथा राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब यांचा व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यावेळी चेअरमन तुळशीराम भोसले, व्हाईस चेअरमन सुभाष गुंडरे, संचालक दिलीप भ . पाटील,माधव सरवदे, सभापती किसन कापसे,मलिकार्जून स्वामी,गोविंदराव कापसे,अमित दवनगावे,, लक्ष्मण सारूळे, चंद्रपाल महाके, माधव चामे, विजय येलमंटे, ज्ञानोबा वाढवणकर, लिपीक इब्राहिम पठाण व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.9 कार्यक्रमाचे प्रस्ताविक - सुत्रसंचलन व अभार बालाजी पडोळे यांनी केले .