logo

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हा नव्या भरारीने पुसतोय आपली ओळख

संपूर्ण जगात नक्षलग्रस्त म्हणून बदनाम झालेला गडचिरोली जिल्हा हळूहळू समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊन नव्या जोमाने कामाला लागल्याची चुणूक दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर पहायला मिळाली. शिव सेना प्रणित शिव उद्योग संघटनेचे महिला , सुशिक्षित बेरोजगार आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे. याच संघटनेच्या गडचिरोली जिल्ह्यातील महिला आणि पुरुष पदाधिकाऱ्यांनी अहेरी, भामरागड, एटापल्ली तालुक्यातील सहकाऱ्यांना बरोबर घेऊन निरनिराळ्या व्यवसायांची सुरुवात केली, ज्यामध्ये प्रामुख्याने देशी गौवंशाच्या पंचगव्यापासून निरनिराळ्या वस्तूंची निर्मिती, शेण,गौमूत्रावर प्रक्रिया करून मानवोपयोगी वस्तूंची निर्मिती, झेंडूच्या फुलांची विक्री , जंगलात मिळणाऱ्या रानौषधांचे संकलन, कापड उद्योग अशा अनेक प्रकारच्या व्यवसायांच्या माध्यमातून अर्थार्जन करून आपली दिवाळी स्वाभिमानाने आनंदात साजरी केली.जिल्ह्यातील तरूण, तरुणी कोणत्याही प्रकारचे काम करुन स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने अत्यंत प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. अनेक आर्थिक, सामाजिक , राजकीय अडचणींवर मात करत आपले ध्येय साध्य करण्यासाठी सर्व जण तयारीला लागले आहे .
स्थानिक तरुण ह्या कामात उत्साहाने सहभाग घेत आहेत.शिव उद्योग संघटनेचे अध्यक्ष श्री दिपक काळीद, सरचिटणीस श्री प्रकाश ओहळे, उपाध्यक्ष श्री गोकुळ लगड,विदर्भ संघटक श्री रघुनाथ लोखंडे, गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख श्री. मनोज गेडाम, पुरुष सचिव श्री.सोनल पुन्घाटे ,महिला सचिव योगिता मेश्राम, महिला जिल्हा प्रमुख मंगला गेडाम यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य मोलाचे ठरते आहे.
कोणत्याही मानसन्मानाची अपेक्षा न ठेवता पोटाची खळगी भरण्यासाठी अहोरात्र प्रामाणिकपणे कष्ट करून समाजात एक नवीन ओळख निर्माण करुन पहाणाऱ्या ह्या समाज बांधवांना प्रगत समाज घटकांनी आपलेपणाची वागणूक दिली तर निश्चितच एक दिवस जगाच्या नकाशावर गडचिरोली जिल्हा आपला ठसा उमटविल्याशिवाय राहणार नाही.

4
78 views