logo

जळगाव जिल्ह्यात महायुतीत फूट — पाचोरा मतदारसंघात शिंदे गट व भाजप दोघेही स्वबळावर

जळगाव जिल्ह्यात महायुतीत फूट — पाचोरा मतदारसंघात शिंदे गट व भाजप दोघेही स्वबळावर

जळगाव जिल्ह्यातील महायुतीमध्ये ‘मिठाचा खडा’ पडल्याचे स्पष्ट झाले आहे. पाचोरा-भडगाव मतदारसंघातील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी आगामी निवडणूक स्वबळावर लढविण्याची घोषणा केल्यानंतर, भाजपचे मंगेश चव्हाण यांनीही तातडीने बैठक घेत भाजप देखील स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले.

यामुळे निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच पाचोरा मतदारसंघात महायुतीची युती फिसकटल्याचे चित्र दिसत आहे. राज्यातील युती तुटण्याची घोषणा करणारा पहिला मतदारसंघ म्हणून पाचोरा मतदारसंघ ठरला आहे.

1
0 views