
अहिल्यानगर मध्ये मातंग समाजातील मुलावर जातीवादी लोकांनी जबरदस्त मारहाण केली.
कर्मट हिंदुत्ववाद्यांनि मातंग तरुणाला केली अमानुषपणे मारहाण.....
सविस्तर बातमी -
सोनई. जिल्हा अहिल्यानगर येथे मातंग समाजातील तरुण संजय वैरागळ याला गावातील कर्मट हिंदुत्ववाद्यांनी अतिशय अमानुषपणे जातीय अहंकारातून मारहाण केली आहे. पीडित तरुणाचा एक डोळा निकामी झाला, असून पायावरून गाडी नेली आहे.
**मातंग समाजाच्या वज्रमुठीत हिंदुत्व आहे **
,असे सांगितले जाते,परंतु त्याचं हिंदू(वैदिक) धर्माने तुमचे सर्वार्थाने शोषण करून तुम्हाला तुमचे स्थान जातीय उतरंडीत सर्वात खालचे,वरच्या सर्व वर्णाची सेवा करण्याचे दिले आहे. माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्ञान, सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठेपासून अलिप्त ठेवले. पवित्रतेच्या भंपक कल्पना पसरवून तुमचा बळी देऊन त्याला मांगीरबाबा बनविले.
महाराष्ट्रभर जातीय भावनेतून तुमच्यावरती अन्याय अत्याचार केले जातात.या वैदिक धर्माविरुद्ध सर्व शोषितांनी एकजूट करून आपला शत्रू, मित्र ओळखून लढावे लागेल.आता जर समाजाला संरक्षण पाहिजे असेल तर, न्यायाने लढा देणे, त्या हि ठिकाणी मातंग समाजाला न्याय व संरक्षण हक्क मिळणार नसेल तर, समाजाला वेगळ्या दिशेने उभे राहावे लागणार आहे. हा समाजाने खूप संकट सहन केली आहे. पण आता नाही, जशास तसे च उत्तर या पुढे मिळणार, हे अन्याय करणाऱ्यांनी समजून घ्यावे.
आज सत्यशोधक बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष संदीप सकट, शहराध्यक्ष सुनील ढोले. राहुल ठोकळ. कॉ प्रवीण सोनवणे यांनी पीडित संजय वैरागर यांची भेट घेऊन संबंधित घटने संदर्भात चर्चा केली तसेच. त्यावेळी उपस्थित पोलीस अधिकारी यांना निवेदन देत. कडक कारवाई करण्याची मागणी केली.
बातमीदार -काळुराम राजगुरू, पुणे
मो. 9604525101