logo

युथ युनिटी रायझिंग फाऊंडेशनच्या कोलार नदी स्वच्छता अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील कोलार नदी परिसरात युथ युनिटी रायझिंग फाऊंडेशन तर्फे स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. छठ पर्वाच्या निमित्ताने आयोजित हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पडला. स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून नदी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्यक्ष श्रमदान केले. सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी नदीकाठावरचा प्लास्टिक, कचरा आणि साचलेली घाण हटवून परिसर स्वच्छ आणि आकर्षक बनवला. प्रदीपकुमार प्रसाद, राजेंद्र चव्हाण, संतोष कश्यप, कृष्ण यादव, राहुल तिवारी, विजय प्रसाद, कमलेश यादव, गुड्डू यादव, निखिल वैश, अरविंद कश्यप, प्रकाश सूर्यवंशी, विजय कैथल, संजय कुरील, चंद्रमणि सिंह, दिलीप शर्मा तसेच इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी मोहिमेत सहभाग घेतला. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक एकता, उत्स्फूर्त सहभाग आणि प्रत्यक्ष श्रमदानातून स्वच्छतेचा प्रभावी संदेश देणे, ज्यामुळे कोलार नदी परिसरात लक्षणीय बदल जाणवला. ही मोहीम समाजातील एकतेचा आणि पर्यावरण संवर्धनाचा आदर्श नमुना ठरली असून नागरिकांनी फाऊंडेशनचे अभिनंदन करून पुढील काळातही अशा उपक्रमांना पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त केला.

15
518 views