logo

हर्षवर्धन पाटील यांचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद दौरा.

हर्षवर्धन पाटील यांचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद दौरा
इंदापूर : प्रतिनिधी दि.20/10/25
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा कंदर (ता. करमाळा) व शिराळा (ता. माढा) येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद दौरा रविवारी (दि.19) संपन्न झाला. यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.
निरा भिमा कारखान्याचा आगामी सन 2025-26 चा गळीत हंगाम 25 वा म्हणजे रौप्यमहोत्सवी गळीत हंगाम आहे. या गळीत हंगामासाठी कारखान्याची दररोज 6500 मे. टन ऊस तोडणी वाहतूकीची यंत्रणा सज्ज झाली आहे. सहकारी संस्थाचा शेतकऱ्यांना नेहमीच आधार वाटला आहे. त्यामुळे सहकारी कारखानदारी महत्वाची आहे. तसेच शेतकऱ्यांना इतर पिकांच्या तुलनेत ऊस पीक शाश्वत वाटत आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी याप्रसंगी सांगितले.
नीरा भीमा कारखान्याने गेली 25 वर्षांचा इतिहास काढून पहा नेहमीच चांगला दर दिलेला आहे. दराच्या बाबतीत कारखाना कधीही मागे राहिलेला नाही. चालु गळीत हंगामात कारखाना इतर कारखान्यांच्या बरोबरीने किंबहुना अधिकचा ऊस दर देईल. तसेच प्रत्येक पंधरवड्याची ऊस बिले अगदी वेळवरती देण्याचे नियोजन कारखान्याने केलेले आहे, असे या संवाद दौऱ्यात हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
आगामी गळीत हंगामामध्ये कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील व कारखान्याच्या अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील यांचे मार्गदर्शनाखाली 7 लाख मे. टन ऊसाचे गाळप कारखाना करणार आहे, अशी माहीती कार्यकारी संचालक यांनी एन. ए. सपकाळ यांनी प्रास्ताविकामध्ये दिली.
या संवाद दौऱ्यामध्ये उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, अँड. कृष्णाजी यादव, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, दत्तात्रय पोळ, निवृत्ती शिंदे, शेतकीचे अधिकारी उपस्थित होते. ____________________________
फोटो:-ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या संवाद दौऱ्यात कंदर, शिरोळा येथे मार्गदर्शन करताना हर्षवर्धन पाटील.

4
411 views