
महेश नागरी पतसंस्थाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता साठी 2 लाख 51 हजार रुपयाचा निधी सुपूर्द.
(बालाजी पडोळे / शिवाजीश्रीमंगले )
विशेष प्रतिनिधी
अहमदपूर/ महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासन शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे.महेश पतसंस्था कायम शेतकरी यांच्या पाठीशी असते. या मदतीत महेश पतसंस्थेचा खारीचा वाटा असावा या उदात्त हेतूने महेश पतसंस्थावतीने 2 लाख 51 हजार रुपयाचा धनादेश राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे यांच्या कडे सुपूर्द करण्यात आला.
अहमदपूर दसरा महोत्सव समिती च्या वतीने 51 हजार रुपयाचा धनादेश सुपूर्द
----------------------
शहरातील सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 51 हजार रुपयाचा धनादेश राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी अहमदपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष लोमटे, दसरा महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ, अशोक सांगवीकर, शिवानंद हेंगणे, ओम पुणे, साईनाथ पाटील, पापा अय्या, शिवकुमार उटगे, राम पाटील, सुभाष गुंडीले, विश्वभंर स्वामी सह विविध मान्यवर उपस्थित होते.