logo

महादेववाडी परिसरातील तरवडेवस्ती ते कृष्णा नगर मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य — टँकर गळती, पाणी साचणे आणि अपघातांमुळे नागरिक हैराण

पुण्यातील तरवडेवस्ती महादेववाडी परिसरातील काळे पडळ पोलिस स्टेशनच्या समोरून कृष्णा नगरकडे जाणाऱ्या रस्त्याची स्थिती सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून टँकर गळतीचे पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी व अपघातांची संख्या वाढली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या परिसरात ओढ्याच्या लगत असणाऱ्या बोरवेलमधून शेकडो टँकरमार्फत आसपासच्या सोसायट्यांना पाणीपुरवठा केला जातो. सततच्या टँकर गळतीमुळे रस्त्यावर कायम पाणी साचलेले असते. परिणामी रस्त्याचे डांबर निघून गेले असून दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
नागरिकांनी PMC आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे त्वरित रस्त्याची दुरुस्ती, टँकर गळतीवर नियंत्रण आणि स्वच्छता मोहिम राबविण्याची मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “दररोज या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे.”

95
3596 views