logo

पाटण गावाचे माजी पं.स.सदस्य श्री.विशाल पवार यांच्यासह समर्थकांचा भाजपात प्रवेश... (वर्षी गटात मिळणार भाजपाला बळ)

(शिंदखेडा प्रतिनिधी - राकेश बेहेरे पाटील)

ऐन जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर पाटण पंचायत समिती गणाचे सदस्य प्रा.डॉ. विशाल पवार यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने वर्षी गटातील व पाटण गणातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत,प्रा.विशाल पवार सलग दोन पंचवार्षिक पासून पाटण गावाचे सरपंच व गटनेते म्हणून यशस्वी पणे कारभार करत आहेत,स्वतः गेल्या पंचायत समिती च्या निवडणुकीत पाटण गणातून मोठे मताधिक्याने निवडून आले होतें ,त्यांच्या भाजपा त जाण्याने वर्षी गटात राजकीय समीकरण बदलणार हे निश्चित आहे,त्यांनी आज मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत शिंदखेडा येथे आपल्या शेकडो समर्थक सह प्रवेश घेतला,
पाटण येथील माजी सरपंच तथा पंचायत समिती सदस्य प्राध्यापक डॉक्टर विशाल पवार सर, लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत सौ अर्चना विशाल पवार, परदेशी समाज पंचमंडळ अध्यक्ष फौजी कैलास भटु परदेशी, माजी उपसरपंच भागवत मगन परदेशी व ज्योत्स्ना मनोहर सावंत, विकास सोसायटी व्हा चेअरमन रामकृष्ण सीताराम पवार, ग्रामपंचायत सदस्य भाईदास आसाराम मोरे, दगुबाई सुकलाल सोनवणे, कमलाबाई सुक्राम मोरे,एकनाथ नाटू कोळी , दीपक सदाशिव पवार ,भटू खंडू पवार, अमोल परदेशी, धर्मेंद्र पुंडलिक पवार, दादाभाई रोहिदास बोरसे,, गणेश परदेशी, सिताराम गुलाब सोनवणे,भाईदास भिल, आदींनी भाजपत प्रवेश केला.
आज पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत शिंदखेडा येथील गांधी चौकात प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी , बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, भाजप शहराध्यक्ष संजय महाजन, प्रकाश देसले, माजी सभापती जिजाबराव सोनवणे, माजी जि प सदस्य पंकज कदम, जि. प.सदस्य देविदास बोरसे,महावीरसिंह रावल, देविदास बोरसे, उपसभापती प्रा. आर जी खैरनार, किशोर रंगराव पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य पि. एल. पवार यांच्यासह भाजपाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

4
99 views