logo

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाई – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश...

अहमदनगर, दि. १९ ऑक्टोबर –
जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी राज्य सरकारने तब्बल ८४६ कोटी ९६ लाख रुपयांचा मदतनिधी मंजूर केला आहे. हा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले असून दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदत पोहोचवावी, अशा स्पष्ट सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

सलग झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. अनेक शेतकरी अडचणीत सापडले. यामुळे शासनाने नुकसानभरपाईच्या स्वरूपात हा निधी मंजूर केला आहे.

पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले की, "शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता दिवाळीपूर्वी खात्यात निधी जमा करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाने पारदर्शकतेने व जलदगतीने मदत वितरित करावी. कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये."

👉 जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना या दिलासा मदतीचा लाभ होणार असून दिवाळीपूर्वी हा निधी मिळाल्याने शेतकरी सुखाचा श्वास घेऊ शकणार आहेत.

26
4245 views