logo

काटोल येथे सरकार मान्य 'वर्धिनी भूमी सेवा माती परीक्षण केंद्राचे' आमदार-चरणसिंग ठाकूर साहेब यांच्या शुभहस्ते उद्घाटन....!

काटोल प्रतिनिधी - न्यूज
काटोल येथे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर धनत्रयोदशीला दि. 18-10-2025 शनिवारला विद्यमान आमदार चरण सिंगजी ठाकूर साहेब यांच्या शुभहस्ते 'सरकार मान्य' वर्धिनी भूमी सेवा माती परीक्षण केंद्रा चा उद्घाटन सोहळा पार पडला.
काटोल येथील युवा नेतृत्व व सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. आकाश जी मेश्राम यांच्या अथक परिश्रमातून वर्धिनी भूमी सेवा माती परीक्षण केंद्राची निर्मिती झाली. या माध्यमातून डिजिटल पद्धतीने मातीचे परीक्षण करून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ तसेच माती चे परीक्षण करून आर्थिक बचत करण्याचा प्रयत्न वर्धिनी भूमी सेवा केंद्राच्या माध्यमातून होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या AI डिजिटल सेवा सुद्धा पुरवल्या जाणार आहे.
या उद्घाटन प्रसंगी विद्यमान आमदार चरणसिंगजी ठाकूर साहेब म्हणाले शेतकऱ्याची आर्थिक बचत होऊन शेतकरी कसा समृद्ध होईल. तसेच शेतीमध्ये AI डिजिटल पद्धतीचा वापर कसा करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला उपस्थित माजी नगराध्यक्ष वैशालीताई ठाकूर, मा. जि.प. सदस्य देविदास कठाणे, मा. विलास कडू सर,समीरजी उमप, संदीप जी सरोदे, दिलीप गायकवाड, शालिनीताई बनसोड, विजय महाजन, सोपान हजारे, रेवतकर मॅडम, सुनील नारनवरे, धीरज ढोके, रवींद्र सोमकुवर, युथ फाऊंडेशनचे बंडू गजबे, दीपक ढोके, राजेश सोनबरसे, तसेच वर्धिनी भूमी सेवा केंद्राचे मित्र-परिवार व प्रतिनिधी उपस्थित होते.

111
5765 views