logo

माजी आमदारावर आले वाईट दिवस

माजी आमदारावर आले वाईट दिवस

पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी असताना किरकोळ मागण्यासाठी स्वतःलाच जावे लागले लातूरमनपात.

स्वतःचा मुलगा नगरसेवक असताना दिसल्या नव्हत्या समस्या आता आठवला मनपाचा उंबरठा; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेचा कळवळा
.......

भाजपचे राष्ट्रीय किसान मोर्चा गुजरात व गोवा राज्य प्रभारी माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर यांच्याकडे पक्षाचे कायकर्ते पदाधिकारी असताना मनपाचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे. शहरातील नेहमीच्या किरकोळ समस्या सोडविण्याच्या मागणीचे निवेदन घेऊन ते मनपात पोहचले, मनपा आयुक्तांची भेट घेत त्यांच्या समोर मागण्यांचा पाडा वाचला. आता स्वतः जाऊन नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे निवेदन दिल्याने नागरिकांच्या समस्या चुटकीसरशी सोडवल्या जातील असच त्यांना वाटलं असावं. पण जनतेचा हा कळवळा त्यांना आताच का आला? म्हणजे त्यांचा मुलगा नगरसेवक असतानाही या समस्या ( कव्हेकरांनी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनातील) होत्याच की, पण तेंव्हा त्यांना त्या दिसल्या नाहीत. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत त्यामुळे नुकताच भाजपचा शहर अध्यक्ष झालेल्या आपल्या सुपुत्राचे राजकीय बस्तान अधिक मजबुत करण्यासाठी जनतेच्या कळवळ्याचा हा आटापिटा आहे, की स्वतःची ओळख पुसट होत असल्याची भावना अस्वस्थ करत आहे त्यामुळेच प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा हा प्रयत्न आहे, अशीच चर्चा लातूरकरांमधून ऐकायला मिळत आहे.

शिवाजी पाटील कव्हेकर यांनी 1995 ला लोकनेते विलासराव देशमुख यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव करत आमदारकी मिळवली. मुख्यमंत्री राहिलेल्या लोकनेत्याचा आपण पराभव करू शकलो या गर्वातून ते अजूनही बाहेर पडलेले दिसत नाहीत. मधल्या काळात त्यांना ना आमदारकी मिळाली ना त्यांनी कुठली महत्वाची जबाबदारी पार पाडली ना जनतेचे भले केले, पदरात संस्था पाडून घेत स्वतःचीच तुंबडी भरून घेतली. मात्र लोकनेता म्हणवून घेत महत्वाचे राजकीय पद मिळविण्याचे त्यांचे स्वप्न विलासराव देशमुख यांच्यामुळे पूर्ण होऊ शकले नाही. पण वास्तव न स्वीकारता आपण विलासराव देशमुख यांचा पराभव केला होता, याच गर्वात ते नेहमी दिसतात. आता त्याचे उरले सुरले स्टारडमही संपुष्टात येत आहे. आता तरुण पिढीचा काळ सुरू झाला. मुलगा भाजप पक्षाकडून नगरसेवक आणि आता पक्षाचा शहर अध्यक्ष झाला. आता त्याचे राजकीय बस्तान अधिक मजबुत होणे गरजेचे आहे पण आपले स्टारडमही कायम राखण्याचे आव्हानही पेलायचे आहे, त्यामुळे शहरातील समस्या सोडविण्यासाठी ते स्वतःच मनपात दाखल झाले. या समस्या तर त्यांचे सुपुत्र अजित पाटील कव्हेकर नगरसेवक असतानाही होत्या, एवढेच नव्हे तर भाजपचे केंद्रात, राज्यात आणि मनपात सत्ता असतानाही होत्याच की, पण तेंव्हा त्यांना या समस्या दिसल्या नाहीत, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत, त्यामुळे त्यांना नागरिकांचा कळवळा आला आहे, ते राष्ट्रीय किसान मोर्चा गुजरात व गोवा राज्य प्रभारी आहेत तर त्यांनी नुकताच लातूर जिल्ह्यात ओल्या दुष्काळाच्या संकटातील शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी जास्तीत जास्त धडपड करायला हवी होती, हा भाग त्याच्या अधिकार क्षेत्रात नसला तरी त्यांचा जिल्हा आहे, मात्र तसे न करता केवळ शहरातील समस्या सोडविण्यासाठी स्वतःच मनपात जाऊन आयुक्तांना मागण्यांचे निवेदन दिले. आता या समस्या काही चुटकीसरशी सोडविल्या जाणार नाहीत पण आपल्याला प्रसिद्धी मिळेल आणि आपल्याला जनतेचा किती कळवळा आहे हे लोकांना कळेल आणि त्याचा फायदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळेल, शिवाय पुसट होत चाललेली आपली ओळख पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात येईल, अशीच भावना यामागे असावी अशीच चर्चा सुजान नागरिकांमधून रंगत आहे.

4
231 views