logo

दसरा महोत्सव च्या वतीने पूरग्रस्तांसाठी 51 हजाराचा धनादेश महाराष्ट्र सहकार मंत्री. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते मुख्यमंत्री सहायता निधी प्रदान.

दसरा महोत्सव च्या वतीने पूरग्रस्तांसाठी 51 हजाराचा धनादेश ना. बाबासाहेब पाटील च्या हस्ते मुख्यमंत्री सहायता निधी प्रदान .
(शिवाजी श्रीमंगले /बालाजी पडोळे) विशेष प्रतिनिधी अहमदपूर महाराष्ट्रातील गंभीर पूरस्थितीची दखल घेत सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून 51 हजार रुपयांचा धनादेश सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ. मंजुषा लटपटे नगरपरिषद चे मुख्याधिकारी संतोष लोमटे दसरा महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक सांगवीकर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवानंद हेगणे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ओम पुणे धनंजय जोशी जुगल ओझा शिवकुमार उटगे दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष साईनाथ पाटील राम पाटील सुभाष गुंडीले अहमदपूरचे तलाठी अविनाश पवार सह दसरा महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी डॉ. अशोक सांगवीकर यांनी दसरा महोत्सव समितीच्या वतीने काटकसरीने खर्च करून उर्वरित रक्कम पूरग्रस्तांसाठी देत असल्याचे सांगितले यावेळी नामदार बाबासाहेब पाटील यांनी महाराष्ट्रातील पूर परिस्थिती अत्यंत बिकट परिस्थिती असून सरकारसोबतच सामाजिक संस्थांनी ही शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिले पाहिजे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विश्वंभर स्वामी यांनी केले तर आभार पापा अय्या यांनी मानले.
जन जन की आवाज सोशल मीडिया , शिरूर ता.

43
655 views