
श्याम महाजन बहुद्देशीय विकास संस्थेतर्फे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा – २०२६ चे आयोजन
श्याम महाजन बहुद्देशीय विकास संस्था, शेडेपार (नोंदणी क्रमांक F-9342, गोंदिया) यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२६ आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा रविवार, दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजता धुकेस्वरी टेम्पल हॉल, देवरी येथे पार पडणार आहे.
या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कारांच्या यादीत आदर्श शिक्षक पुरस्कार, आदर्श महिला शिक्षक पुरस्कार, युवा उद्योजक पुरस्कार, आदर्श युवा नेता पुरस्कार, आदर्श पत्रकार पुरस्कार, सामाजिक सेवा पुरस्कार, महिला गौरव पुरस्कार, प्रतिष्ठित नागरिक गौरव पुरस्कार, सहकार महर्षि पुरस्कार तसेच गुणवंत विद्यार्थी पुरस्कार अशा विविध सन्मानांचा समावेश आहे.
इच्छुक व्यक्तींनी आपल्या नामांकनासाठी संपर्क साधावा:
📍 साई ऑनलाइन केंद्र, शेडेपार, ता. देवरी, जि. गोंदिया - 441901
📧 ईमेल: mbuvs2021@gmail.com
📞 मोबाईल: ९६३७३०६३७७
या राज्यस्तरीय सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून, समाजातील कार्यकर्त्यांच्या योगदानाचा गौरव करण्याचा हेतू असल्याचे मत संस्थेचे सचिव डॉ. घनश्यामजी निखाडे यांनी व्यक्त केला आहे करिता विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी अधिकाधिक संख्येने सहभाग नोंदवावा.