अहेरी तालुका पत्रकार संघटनेतर्फे 14 शाळेतील चिमुकल्यांना शैक्ष. साहित्य वाटप
अहेरी तालुका पत्रकार संघटनेतर्फे 14 शाळेतील चिमुकल्यांना शैक्ष. साहित्य वाटप
गडचिरोली:अहेरी
पत्रकारांनी सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून आलापल्ली केंद्रातील 14 जिल्हा परिषदांच्या शाळांमधील 549 विद्यार्थ्यांना नोटबुक, कंपास व पेनचे वितरण तालुकाध्यक्ष ऋषी सुखदेवे यांच्या नेतृत्वातील तालुका पत्रकार संघटना अहेरीने नायब तहसीलदार नरेंद्र दाते यांच्या हस्ते जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा आलापल्ली येथे वितरण करून समाजहित जोपासल आहे.
वितरणावेळी बीआरसीचे सर्वसमावेशिक शिक्षक तज्ञ पी.यू. मानकर, केंद्रप्रमुख विनायक पूरकलवार, पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष आसिफ खान पठाण, सल्लागार सदाशिव माकडे, संघटक मुकुंदा दुर्गे, पेर्मिलीचे डॉ. शंकर दुर्गे, बोरीचे अनिल गुरनुले, विस्तारी गंगाधरीवार, चंद्राचे गणेश शिंगरेड्डीवार, शाळेचे मुख्याध्यापक श्रीनिवास कोंडरा, अजय सोनलवार उपस्थित होते.
नायब तहसीलदार व केंद्रप्रमुख पूरकलवार यांनी तालुका पत्रकार संघटनेच्या उपक्रमांची प्रशंशा करून गरीब व गरजू मुलांना नक्की याचा फायदा होणार असल्याचे सांगून संघटनेच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या.
आलापल्ली केंद्रातील जिल्हा परिषदेच्या आलापल्ली जीप कन्या, मानेवार कॉलनी, आलापल्ली मुले, नागेपल्ली, फुलसिंगनगर बुरकमपल्ली, यंकापल्ली, बुर्कामलमपल्ली, टेकमपल्ली, मोसम, जिमेला, तलवाडा, मिरकल व सकीणगट्टा अशा 14 शाळेतील विद्यार्थ्यांना ऋषी सुखदेवे यांच्या नेतृत्वातील तालुका पत्रकार संघटनेने शैक्षणिक साहित्य वाटून चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले.
यावेळी महागाव, बोरी, पेरमिली, कमलापूर, जिमलगट्टा, गुड्डीगुडम , वेंकटापूर, आलापल्ली व अहेरी येथील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत व सहकार्य केले.
यावेळी 14 ही जि प शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. यात मुकुंद सडमेक, अतीक शेख, नारायण सिडॉम, संजय राठोड, उद्धव गोल्हार, जगदीश बोमावार, शंकर अग्गुवार, दिगंबर बोलगोडवार, सुगंधा सडमेक, शबरी मळावी, नीलिमा पातावार, बेबीताई झिलपे, सुमित्रा दहागावकर ,सत्यवान खोब्रागडे यांचा समावेश आहे.
यापूर्वीही संघटनेचे तालुक्यातील विद्यार्थ्यांत शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी राजाराम केंद्रातील 807 विद्यार्थ्यांना, पेरमेली केंद्रातील सहा शाळेत, देवलमारी केंद्रातील अकरा शाळेत, इंदिराम येथील बालिका विद्यालयात, काटेपल्ली येथील भगवंतराव आश्रम शाळेत, अहेरी केंद्रातील बारा शाळेत, ताटीगुडम उच्च प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वितरित केले. तसेच तालुक्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील 1 हजार 868 विद्यार्थ्यांची सामान्य ज्ञान स्पर्धा घेऊन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.