logo

एस.ई. एस हायस्कूल चा संघ विभागीय स्तरावर



सिंदखेड राजा ता. प्रतिनिधी जुबेर शाह

साखरखेर्डा ; स्थानिक एस ई एस हायस्कूल तथा ज्युनिअर कॉलेजचा संघ पुन्हा एकदा विभागीय स्तरावर पोहोचला आहे. या आधी सुद्धा एस ई एस हायस्कूल च्या क्रिकेट संघाने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला होता. त्यांची साखरखेर्डा गावातून विजय मिरवणूक सुद्धा निघाली होती. ही स्पर्धा दिनांक 15/ 10 /2025 ला जिल्हा क्रीडा संकुल बुलढाणा येथे पार पडली. श्री जाधव सर सचिव जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन बुलढाणा, श्री देवल सर भारत विद्यालय बुलढाणा यांनी आयोजक म्हणून काम पाहिले. मुलींच्या क्रिकेट संघाच्या सत्कार वेळी संस्थेचे सचिव चंद्रशेखर शुक्ल, प्राचार्य व्ही. एम. ठाकूर, पर्यवेक्षक पी. एस. पागोरे, प्रा. ऋषिकेश शुक्ल, जेष्ठ क्रीडा शिक्षक एम.टी. रबडे, दर्शन कुमार गवई, के. ए. कामे, रोशन जोशी, अमोल लांभाडे, सय्यद इमरान, गौतम जाधव, वैशाली शुक्ल, सुमन सरकटे, माधुरी मोरे, राधा जोशी, संगीता चव्हाण, दिपाली जोशी, पूजा पाटील, उज्वला कुलकर्णी हे सर्वजण उपस्थित होते. तसेच विजय क्रिकेट संघाचे परिसरातून कौतुक होत आहे

50
3628 views