logo

मुख्य सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा निषेध



सिंदखेड राजा ता. प्रतिनिधी जुबेर शाह

साखरखेर्डा ;बुलढाणा जिल्हा काष्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करीत मुख्य सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला . आणि आरोपीला शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली .
१५ ऑक्टोबर रोजी बुलढाणा जिल्हा काष्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्य सरचिटणीस सुभाष डोंगरदिवे , कास्ट्राईब शिक्षक संघटना राज्य उपाध्यक्ष दिलीप खंडारे , जिल्हाध्यक्ष शेषराव वाकोडे , जिल्हा सरचिटणीस प्रदिप इंगळे , तालुकाध्यक्ष राजू जाधव , प्रदीप बावस्कर , सुयोग चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले . त्यांनी निवेदनात नमूद केले आहे की , महामहीम सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावर राकेश किशोर या वकीलाने कामकाज सुरू असताना पायातील बूट काढून तो सरन्यायाधीश यांच्या दिशेने भिरकावला . त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा तसेच भारतीय लोकशाही , संविधानाचा अवमान केला आहे . या घटनेची उच्च स्तरीय चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करुन अशा प्रकारच्या घटनांवर भविष्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी केली आहे .

41
4911 views