logo

भीम आर्मीचा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.. (बुलढाणा अर्बन बँक शाखेच्या माध्यमातून अनेक ग्राहकांच्या तक्रारी.. सतीश पवार )

*



*बुलढाणा*/ विजय दोडे - देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात बुट भिरकावण्याचा घृणास्पद प्रयत्न झाला. गेल्या कित्येक वर्षांपासून सर्वोच न्यायालयात विकिली करणाऱ्या राकेश किशोर या वकिलानेच हे कृत्य केले. त्याच्या या कृत्यानंतर संपूर्ण देशामधून संताप व्यक्त करण्यात येत आहे, सरन्यायाधीश पद हे अत्यंत सर्वोच्च आणि सन्माननीय आहे. असे असताना त्याने या पदावर बसलेल्या न्यायमूर्तीकडे बुट भिरकावण्याचा प्रयत्न केल्याने या वकिलावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भीम आर्मीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी जिल्हाधिकारी मार्फत महामहीम राष्ट्रपती आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे एका प्रकान्वये केली आहे .
मा. सरन्यायाधीश यांच्यावर हल्ला करणाऱ्या अँड. राकेश किशोर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे तथा हल्ला झाला त्या दिवसाला न्यायव्यवस्थेतील काळा दिवस म्हणून जाहीर करा. दि. 06 ऑक्टोबर 2025 रोजी देशाच्या न्यायव्यवस्थेला काळीमा लावणारी घटना देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये घडली. अँड .राकेश किशोर नामक व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही घटना न्यायव्यवस्थेला कलंकित करणारी घटना आहे. त्यांनी केलेला हल्ला हा केवळ एका व्यक्तीवर नसून तो या देशाच्या संविधानावर व संविधान द्वारा स्थापित न्यायव्यवस्थेवर आहे. हे कृत्य अतिशय निंदनीय व अत्यंत कठोर शिक्षेस पात्र आहे. त्यासाठी सदर घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ फाशी देण्यात यावी. जेणेकरून अशा घटना भविष्यात पुन्हा होणार नाहीत व न्यायालयाची गनिमा कायम राहील. 6 ऑक्टोबरला न्यायव्यवस्थेतील काळा दिवस म्हणून घोषित करण्यात यावे. जनमाणसा मध्ये न्यायालय व कायद्याप्रती आदर रहावा त्यासाठी देशातील प्रत्येक न्यायालयासमोर भारतीय संविधानाची प्रत हातामध्ये असलेला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा उभारण्यात यावा .भविष्यात अशा प्रकारच्या गैर कायदेशीर घटना टाळण्यासाठी न्यायालय परिसरातील नव्याने उभारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यांना व संबंधित न्यायालयाच्या न्यायाधीशांना झेड प्लस दर्जा प्राप्त सुरक्षा देण्यात यावी. या मागण्या घेऊन दि.17 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 2.00 वाजता हा जणआक्रोश मोर्चा टिळक नाट्य मंदिर बुलढाणा येथील मैदानावर पार पडला.
विविध घोषणांसह परिसर कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला होता.
भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सतीशदादा पवार,प्रकाश भाई धुंदळे ,जितेंद्र खंडेराव यांच्या नेतृत्वात हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे धडकला ..यावेळी बहुजन समाज बांधव महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*बुलढाणा अर्बन बँक शाखेच्या माध्यमातून अनेक ग्राहकांच्या तक्रारी..जिल्हाध्यक्ष सतीश पवार*

- बुलढाणा अर्बन चे सर्वेसर्वा यांनी एका वर्तमानपत्रांमध्ये दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की देशाच्या सरन्यायाधीशावर जो हल्ला झाला ,त्या हल्ला करणाऱ्या व्यक्तीला सरन्यायाधीशानी क्षमा केली आहे. त्यांचा चांगलाच समाचार भीम आर्मी जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी घेतला , ते म्हणाले की बुलढाणा अर्बन बँक शाखेच्या माध्यमातून अनेक ग्राहकांच्या तक्रारी आहेत, त्यांनी वेळेत कर्ज न भरल्यास आपण त्यांच्या संपत्तीचा लीलाव केला आहे, लिलाव न करता आपण या ग्राहकांचे कर्ज माफ करून त्यांना देखील क्षमा करणार आहात का ? एवढेच नाही तर आम्ही देखील तुमच्या कानशिलात लावून आम्हाला देखील क्षमा करणार का?असा सणसणीत सवाल देखील त्यांनी या मोर्चाच्या माध्यमातून उपस्थित केला.

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध ,फुले,शाहू आंबेडकर , छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारां च्या समाजाची परिस्थिती बदलत असताना येथील परिस्थिती आज पुन्हा मागे घेऊन जाती काय, असा प्रश्न बहुजन समाजामध्ये निर्माण झाला आहे , आज प्रतीकात्मक परिस्थिती गळ्यात गाडगे , पाठीला झाडू आणि पायात फाटलेल्या चपला , एकही नसलेला कपडा याचे चित्रीकरण या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. हा मोर्चा म्हणजे सरकारचं हे अपयश आहे एवढी परिस्थिती बदलत असताना देशाच्या पंतप्रधानांनी या वकिलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा होता. उलट त्याला सरकार पाठीशी घालत आहे.

*जनतेच्या न्याय हक्कासाठी आहे बहुजन समाजावर अन्याय झाला तर आम्ही तुटून पडू ..प्रकाश भाई धुंदळे*

समाज भूषण प्रकाश भाई धुंदळे यांनी देखील व्यवस्थेचा चांगलाच समाचार घेतला भीम आर्मी, ही जनतेच्या न्याय हक्कासाठी आहे बहुजन समाजावर अन्याय झाला तर आम्ही तुटून पडू , आणि व्यवस्थेला धारेवर धरून व्यवस्थेला प्रश्न विचारू. जितेंद्र खंडेराव, कमलाकर काकडे, मेजर खिल्लारे समाधान जाधव यांचे देखील भाषणे झाली. या मोर्चाचे सूत्रसंचालन प्रा. कडूबा पैठणे यांनी केले तर या मोर्चाला मोठ्या संख्येने पदाधिकारी, महिला आणि कार्यकर्ते उपस्थित होते.





*प्रमुख मागण्या*
1)- घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ फाशी देण्यात यावी. जेणेकरून अशा घटना भविष्यात पुन्हा होणार नाहीत व सन्माननीय न्यायालयाची गरिमा कायम राहील.
2)- 6 ऑक्टोबर 2025 न्यायव्यवस्थेतील काळा दिवस म्हणून घोषित करण्यात यावे.
3)- जनमाणसा मध्ये न्यायालय व कायद्याप्रती आदर रहावा त्यासाठी देशातील प्रत्येक न्यायालयासमोर भारतीय संविधानाची प्रत हातामध्ये असलेला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा उभारण्यात यावा.
4) - प्रत्येक जिल्ह्याच्या सामाजिक न्याय भवनाच्या प्रांगणामध्ये महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात यावा
5)- भविष्यातील अशा प्रकारच्या गैर कायदेशीर घटना टाळण्यासाठी न्यायालय परिसरातील नव्याने उभारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्यांना व संबंधित न्यायालयाच्या न्यायाधीशांना झेड प्लस दर्जा प्राप्त सुरक्षा देण्यात यावी.
6) संविधान निर्माण कार्यामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे काहीच योगदान नाही असे वारंवार विधान करून सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या विकृत मानसिकतेच्या ॲड .अनिल मिश्रा यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा.

15
814 views