logo

त्रस्त नागरिकाचे नगरपालिका विरोधात पालक मंत्र्यांकडे निवेदन

निवेदन

मा. पंकज भोयर साहेब,
मा. पालकमंत्री, वर्धा जिल्हा

विषय: देवळी नगरपरिषदेमधील घरकुल योजनेतील अन्यायकारक वितरण, पात्र नागरिकांना लाभ न मिळणे व जमिनीच्या वर्गीकरणातील विसंगतीबाबत निवेदन.

महोदय,

मी खाली सही करणारा शंकर अंबादास केवडे, रा. इंदिरानगर, वार्ड क्र. १६, देवळी, जि. वर्धा — तसेच माझ्यासह आमच्या परिसरातील अनेक नागरिकांनी सन २०१७-१८ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (BLC) अंतर्गत अर्ज केले होते. मात्र, आजतागायत आम्हाला या योजनेचा कोणताही लाभ मिळालेला नाही.

आमच्या परिसरात २०१०-११ दरम्यान मोठ्या प्रमाणात घरकुल निर्मिती झाली होती. त्या काळात सदर जमीन ही शासकीय कुरण क्षेत्र म्हणून नोंद होती. परंतु २०२३ नंतर तीच जमीन “वनविभाग” क्षेत्रात दाखवण्यात आली, ज्यामुळे आम्हाला घरकुल योजनेचा लाभ नाकारण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, आमच्याच परिसरातील काही नागरिकांना २०१७-१८ मध्ये घरकुलाचा लाभ मिळाला तसेच काहींना पट्टे देखील देण्यात आले, मग आम्हाला त्या काळातच का वंचित ठेवण्यात आले — हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

ही परिस्थिती पूर्णतः प्रशासनिक दुर्लक्ष व विसंगतीमुळे निर्माण झाली असून, त्याचा परिणाम आम्हा पात्र व गरजू नागरिकांवर झाला आहे. आम्ही वारंवार नगरपरिषद देवळी, तसेच प्रादेशिक व राज्यस्तरावर तक्रारी दिल्या आहेत; तरीदेखील आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

त्यामुळे नम्र विनंती आहे की –

1. देवळी नगरपरिषदेमधील प्रधानमंत्री आवास योजना (BLC) अंतर्गत अर्जदारांच्या यादीची व कार्यपद्धतीची सखोल चौकशी करण्यात यावी.


2. २०१०-११ पासून आजपर्यंत झालेल्या जमिनीच्या वर्गीकरणातील बदलाची चौकशी करून, सदर जमीन पुन्हा “शासकीय क्षेत्र” म्हणून घोषित करण्यात यावी.


3. पात्र व वंचित अर्जदारांना त्वरीत घरकुल मंजूर करण्यात यावे.


4. या प्रकरणात जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.


5. सदर प्रकरणाची जिल्हास्तरीय चौकशी समिती स्थापन करून पारदर्शक अहवाल प्रसिद्ध करण्यात यावा.



महोदय,
आम्ही आपल्या न्यायप्रिय व लोकाभिमुख नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवतो. आपण या गंभीर प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून आम्हा पात्र नागरिकांना न्याय व घरकुलाचा हक्क मिळवून द्याल, अशी मनःपूर्वक अपेक्षा आहे.

आपला विश्वासू,


शंकर अंबादास केवदे
पत्ता: इंदिरानगर, वार्ड क्र. १६, देवळी, जि. वर्धा
मो. क्र.: ७०५८४१६७४३
दिनांक: १७ / १० / २०२५

10
5620 views