logo

मीच माझ्या सर्कलचा बाळासाहेब आंबेडकर होऊन काम करा कार्यकर्त्यांना सुजात आंबेडकर यांचे आव्हान !

निलेश दाभाडे नांदुरा : येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता वंचित बहुजन आघाडीने चांगलीच कंबर कसल्याची दिसून येत आहे. काल 15 ऑक्टोंबर रोजी नांदुरा येथील जुन्या कॉटन मार्केट येथे भव्य संकल्प सभेचे नांदुरा तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही कार्यकर्त्याची निवडणूक असून यावेळी पूर्ण ताकदिशी कार्यकर्त्यांनी निवडणुकीला सामोरे जावे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्यास जिगाव प्रकल्पग्रस्त शेतकरी जे शासनाच्या मदतीपासून वंचित राहिलेले आहेत त्यांना पूर्ण मदत दिल्या जाईल व जिगाव प्रकल्प तातडीने पूर्ण केला जाईल नांदुरा येथील उड्डाणपुलाचा प्रश्न सुद्धा आम्ही मार्गी लावू युवकांना रोजगार उपलब्ध करून देऊ शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कापसाला सुद्धा योग्य भाव देऊ असेही शेवटी सुजात आंबेडकर म्हणाले. कार्यकर्त्यांनी स्थानिक प्रश्नांचा अभ्यास करावा प्रत्येक सर्कल मध्ये योग्य उमेदवार देऊन मीच माझ्या सर्कलचा बाळासाहेब आंबेडकर होऊन कार्यकत्यांनी काम करावे असे आव्हान सुजात आंबेडकर यांनी आपल्या युवा कार्यकत्यांना केले. यावेळी स्टेजवर बहुजन आघाडीचे विदर्भ उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद भाऊ वसतकार, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष देवा भाऊ हिवराळे, घाटावरील जिल्हाध्यक्ष निलेश जाधव, युवा बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अनिल भाऊ वाकोडे, भाऊराव उबाळे, डॉ. प्रवीण पाटील, राजेंद्र शेगोकार, विलास तीतरे, सलीम भाई, आतिश भाई खराटे, अनिल अंबलकर, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हा अध्यक्ष मोहित दामोदर, ऍड. सदानंद ब्राह्मणे, अँड रागिनीताई तायडे, मलकापूर तालुका अध्यक्ष अजय भाऊ साबळे, भूषण भाऊ वाकोडे, महिला जिल्हाध्यक्ष विशाखा ताई सावंग, आदी मान्यवर उपस्थित होते. या भव्य संकल्प सभेचे अध्यक्ष नांदुरा तालुका अध्यक्ष अनिल धुंदळे हे होते. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खामगाव वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष शांताराम पाटेखेडे यांनी केली. ही संकल्प सभा यशस्वी करण्यासाठी नांदुरा तालुका वंचित बहुजन युवा
आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेऊन सभा यशस्वी केली.

22
1789 views